मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
पॅलेस्टाईनचे समर्थन केल्यामुळे नागपुरातील एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
पुणे पोर्शे कार अपघातातील घटना रोज समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना आता अटक करण्यात आली असून ब्लड सॅम्पल प्रकरणात त्यांनी पैसे देऊन रिपोर्ट बदलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नागपूर येथील तापमान मोठ्या प्रमाणावर तापायला सुरुवात झाली असून येथील तापमान ५६ डिग्री सेल्सियस पर्यंत जाऊन पोहचले आहे. उन्हाच्या वेळी बाहेर जाऊन अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवत आहे.
मुंबईमध्ये मेगाब्लॉक केल्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फलाट क्रमांकाची रुंद वाढवण्यासाठी हे करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली. टू व्हिलरवरुन दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केला आणि या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने निलंबन करण्यात आले आहे. विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता असून राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता आहे.
Pune Porsche Crash : पुणे पोर्श कार दुर्घटनेच्या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी आरोपी डॉ. अजय तावरे संदर्भात मोठा खुलासा केला आहे. अशातच डॉ. तावरेच्या समस्या वाढू शकतात.