रविवारी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने महाराष्ट्राच्या राजधानीसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, 'ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस' होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई : रविवारी मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने महाराष्ट्राच्या राजधानीसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, 'सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मुसळधार पाऊस' होण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) रविवारी महाराष्ट्रातील मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला होता. रायगडसाठी रविवारी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

मुंबईत झाला मुसळधार पाऊस 

यापूर्वी, शनिवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला होता, मुंबई शहरात सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत सरासरी ६.८० मिमी, पूर्व उपनगरात ११.५३ मिमी आणि पश्चिम उपनगरात ७.४२ मिमी पाऊस नोंदवला गेला, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली. शनिवारी, पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता आणि मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट होता.

पावसाचा जोर काही भागात राहणार 

महाराष्ट्रात पावसाचा जोर काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या भागांमध्ये विजांसह सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ढगाळ वातावरण राहणार

 मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र आकाश ढगाळ राहील, पण बहुतेक ठिकाणी पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु काही भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी येऊ शकतात. शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस काही भागांमध्ये झाला असला, तरी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.