नाशिकमधील अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या 200 पर्यटकांचा वन विभागाकडून बचाव

| Published : Jul 15 2024, 10:16 PM IST

anjaneri fort

सार

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथील अंजनेरी किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना वन विभागाकडून सुखरूप टेकडीवरुन खाली आणण्यात आले आहे. याची माहिती नाशिक पश्चिमच्या आरएफओ वृषाली घाडे यांनी दिली आहे.

Maharashtra News : नाशिकमधील अंजनेरी किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक टेकडीवर चढले होते. यावेळी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने तेथील पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागले होते. यामुळेच जवळजवळ 200 जण अडकले गेले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथाकडून बचाव कार्य सुरु करत पर्यटकांचा जीव वाचवण्यात आला. वन विभागाच्या पथकाने जवळजवळ 6 तास सातत्याने बचाव अभियान राबवले. मुसळधार पावसामुळे अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या 200 पर्यटकांना बचाव कार्यादरम्यान रेस्क्यू करण्यात आले आहे.

आरएफओ यांनी दिली माहिती
नाशिक पश्चिमच्या आरएफओ वृषाली घाडे यांनी म्हटले की, रविवारी अंजनेरी किल्ल्यावर नेहमीप्रमाणे अधिक गर्दी झाली होती. याचवेळी काही जण टेकडीवर गेले होते. अशातच अचानक मुसळधार पाऊस झाल्याने पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागले. यामुळेच टेकडीवर गेलेल्या पर्यटकांना खाली येण्यास अडथळा निर्माण झाला. या घटनेची माहिती वन विभागाला दिली गेली. यानंतर वन विभागाने किल्ल्याच्या टेकडीवर अडकलेल्या 200-300 जणांना खाली उतरवले.

दरम्यान, देशात सध्या बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे अनेकजण फिरायला जायचे प्लॅन करतात. खरंतर, पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे वारंवार सांगूनही काही पर्यटक तेथे जाण्याचे धाडस करतात. अशातच मोठी दुर्घटना घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लोणावळा येथील भूशी डॅममध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती.

पुण्यातील धबधबे पर्यटकांसाठी बंद
पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. लोणावळा आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावली उचलली आहेत. पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यास जीवघेणा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटासुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील कोणकोणती पर्यटनस्थळं राहणार बंद?

  • भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद
  • कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद
  • घोंगळ घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद
  • शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद
  • चोंडीचा धबधबा बंद
  • भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद
  • कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद
  • घोंगळ घाट नाला, खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद
  • शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद
  • चोंडीचा धबधबा बंद

आणखी वाचा : 

कोकणात मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, प्रशासन सतर्क

Mukhyamantri Warkari Sampradaya Mahamandal : राज्य सरकार करणार 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना, 50 कोटींची केली तरतूद