Weather Update: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल, मुंबईसह 11 जिल्ह्यांसाठी नवा अलर्ट
Weather Update: गणपती विसर्जनानंतर राज्यात दमट हवामान आणि तापमानात वाढ झाली असून, पुढील २४ तासांत काही भागांत पावसाचा अंदाज आहे. विदर्भात ११ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता आहे, त्यानंतर कोकण, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.

मुंबई: राज्यात हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत. गणपती विसर्जनानंतर पावसाने काहीसा उगम घेतला असला तरी दमट हवामानामुळे तापमानात वाढ झाली आहे. पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून, काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/zAcu1ghsqq
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 9, 2025
मुंबई आणि कोकण: उकाडा वाढतोय, पण पाऊसही सोबत
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बुधवारी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान: 32°C
किमान तापमान: 24°C
हवामान: ढगाळ आकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस संभवतो
कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही याच प्रकारचं हवामान राहील.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, कोल्हापूर, सोलापूरमध्ये हलकासा पाऊस
पुणे परिसरात आकाश ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाची शक्यता आहे.
पुणे: कमाल 30°C, किमान 19°C
सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्याशा सरी पडतील. मुसळधार पावसाची शक्यता नाही.
उत्तर महाराष्ट्र: ढगाळ हवामान कायम
नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
नाशिक: कमाल तापमान 27°C, किमान 18°C
काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
मराठवाडा: काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
लातूर, नांदेड, परभणी, आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगर: ढगाळ वातावरण, मध्यम पावसाची शक्यता, तापमान 31°C/22°C
उर्वरित मराठवाड्यात हवामान विभागाने कोणताही सतर्कता इशारा दिलेला नाही.
विदर्भ: उष्णतेत वाढ, पण पावसाचीही शक्यता
विदर्भात तापमान झपाट्याने वाढले आहे.
नागपूर: कमाल 33°C, किमान 24°C
ढगाळ आकाश राहून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यव्यापी हवामान
भारतीय हवामान विभागानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मात्र 11 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यानंतर कोकण, दक्षिण मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढेल.
सावधगिरीचा सल्ला
तापमानात होणारी वाढ आणि दमट हवामानामुळे नागरिकांनी पाण्याचे सेवन वाढवावे आणि गरज नसताना उन्हात बाहेर जाणे टाळावे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

