एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या आश्विनी केदारी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिटरचा झटका लागून उकळते पाणी अंगावर पडल्याने त्या ८० टक्के भाजल्या होत्या. ११ दिवसांच्या मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले.

पुणे: एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं की गावाकडं तरुणांचा रुतबा वाढत असतो.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत राज्यात अव्वल असलेल्या आश्विनी केदारी हीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आश्विनी २०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली होती. मागील जवळपास अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता, पण त्याला यश आलं नाही.

खेड तालुक्यावर कोसळली शोककळा 

२८ ऑगस्ट रोजी आश्विनी केदारीसोबत एक दुःखद प्रसंग घडला आहे. सकाळी अभ्यास करताना तिने अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. पाणी किती गरम झालं आहे ते पाहायला आश्विनी गेली, त्यावेळेला तिला हिटरचा मोठा झटका बसला. या शॉकमुळे उकळते पाणी तिच्या अंगावर पडले आणि ती या अपघातात तब्बल ८० टक्के भाजली.

कुटुंबियांना ती भाजल्याचा समजल्यानंतर तिला ताबोडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु झाले. या दरम्यान गेल्या काही ११ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज होती. मात्र त्यात अपयश आले असून उपचारादरम्यान तिचे दुर्दैवी निधन झालं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलं यश

२०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून आश्विनी ही पहिली आली होती. बाथरूममध्ये हिटरचा धक्का बसून पाणी अंगावर सांडल्यामुळे केदारी जवळपास ८० टक्के भाजल्या होत्या. मात्र अकरा दिवसांची त्यांच्या मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती. त्या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होत्या. अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.