सार

शिवाजीनगर भागातील टिंबर मार्केट परिसरात रस्त्यावर पाणी साठले. गणेशखिंड रोड परिसरात देखील हीच परिस्थिती होती.

 

पुण्यात पहिल्याच मोठ्या पावसात पुणेकरांची तारांबळ झाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागली. काही वेळ झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचं रुप आलं होतं. घराबाहेर असलेल्या नागरिकांची देखील या पावसाने धांदल उडाली.

कुठे किती पाऊस झाला? (संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत)

शिवाजीनगर - 67.4 मिमी

पाषाण - 56.8 मिमी

एनडीए - 26.0 मिमी

इंदापूर - 11.5 मिमी

गिरीवन - 5.0 मिमी

हडपसर - 3.0 मिमी

हवेली - 1.5 मिमी

लव्हाळे - 1.0 मिमी

बालेवाडी - 0.5 मिमी

पुण्यात दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. ढगाच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. पावसाचा अंदाज नसल्याने नागरिक रेनकोट आणि छत्री न घेताच बाहेर पडले होते. मात्र दीड तासाहून अधित वेळ झालेल्या पावसाने नागरिकांची मोठी अडचण केली. पुण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मार्ग काढणे अवघड बनले होते. अनेक ठिकाणी अनेक दुचाकी पावसामध्ये अडकून पडल्या. पुण्यातील गणेशनगर एरंडवणा भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं.

आणखी वाचा :

Monsoon Update 2024: दक्षिण कोकणातच मान्सूनचा मुक्काम, राज्यात काही जिल्ह्यांत यलो अलर्ट