MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • रेल्वेचा मोठा 'रोलिंग ब्लॉक'! गुंटूर एक्सप्रेस आता छत्रपती संभाजीनगरऐवजी 'येथून' सुटणार; प्रवाशांचे हाल वाढणार

रेल्वेचा मोठा 'रोलिंग ब्लॉक'! गुंटूर एक्सप्रेस आता छत्रपती संभाजीनगरऐवजी 'येथून' सुटणार; प्रवाशांचे हाल वाढणार

रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे, प्रसिद्ध गुंटूर एक्सप्रेस ४ फेब्रुवारी ते २७ मे या कालावधीत छत्रपती संभाजीनगरऐवजी थेट जालना स्थानकावरून सुटणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना जालन्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 04 2026, 05:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेल्वेचा मोठा 'रोलिंग ब्लॉक'! गुंटूर एक्सप्रेस आता छत्रपती संभाजीनगरऐवजी 'येथून' सुटणार
Image Credit : Asianet News

रेल्वेचा मोठा 'रोलिंग ब्लॉक'! गुंटूर एक्सप्रेस आता छत्रपती संभाजीनगरऐवजी 'येथून' सुटणार

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी (Rolling Block) रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. याचा थेट फटका छत्रपती संभाजीनगरहून हैदराबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. प्रसिद्ध गुंटूर एक्सप्रेस (Guntur Express) आता ४ फेब्रुवारी ते २७ मे या कालावधीत छत्रपती संभाजीनगर स्थानकाऐवजी थेट जालना स्थानकावरून प्रस्थान करणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
Image Credit : ANI

प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

या कालावधीत रेल्वेच्या वेळापत्रकात आणि मार्गात खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:

बदलेली टर्मिनस: गुंटूर एक्सप्रेस आता छत्रपती संभाजीनगरला येणार नाही. ती जालना येथूनच सुटेल आणि गुंटूरहून येताना जालन्यातच थांबेल.

वेळ: ही गाडी सायंकाळी ५:३० वाजता जालना स्थानकातून रवाना होईल.

वार: दर आठवड्याला मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवसांच्या प्रवासावर याचा परिणाम होईल.  

Related Articles

Related image1
पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'
Related image2
Mumbai Pune Expressway : आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी; मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग 15 तास ठप्प
35
प्रवाशांपुढे प्रवासाचे संकट
Image Credit : Social Media

प्रवाशांपुढे प्रवासाचे संकट

छत्रपती संभाजीनगर ते जालना या दरम्यान रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जालन्यापर्यंत पोहोचण्यासाठी एसटी बस किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल. सिडको बसस्थानकावरून दर अर्ध्या तासाला जालन्यासाठी बस उपलब्ध असली तरी, सामानासह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. 

45
'या' गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल
Image Credit : Getty

'या' गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल

रोलिंग ब्लॉकमुळे केवळ गुंटूर एक्सप्रेसच नाही, तर इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे: १. काचीगुडा-नगरसोल (१७६६१): सेलू ते जालना दरम्यान ही गाडी सुमारे १.५ तास उशिराने धावेल. २. काचीगुडा-नगरसोल (१७६८७): ही गाडी छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान अंदाजे २० मिनिटे विलंबाने धावेल. 

55
प्रवाशांना आवाहन
Image Credit : iSTOCK

प्रवाशांना आवाहन

३ फेब्रुवारी ते २७ मे दरम्यान या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे सुधारित वेळापत्रक तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून स्थानकावर ताटकळत राहावे लागणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Baby Sold For Smartphone : फोनसाठी आई-वडिलांनीच विकलं स्वतःचं बाळ, आजारपणामुळे फुटलं बिंग
Recommended image2
Walmik Karad : वाल्मिक कराडभोवती 12 हायटेक कॅमेरे, मोबाइलचा वापर शक्य नाही; बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा
Recommended image3
Mazagon Dock : माझगाव डॉकचा थुथुकुडी प्रोजेक्ट रद्द, आता महाराष्ट्रावर फोकस
Recommended image4
Devendra Fadnavis: निवडणूक आयोगावरील आरोप हा 'फेक नॅरेटिव्ह', फडणवीसांचा पलटवार
Recommended image5
Diveagar Beach Tragedy : 'खोल पाण्यात जाऊ नका', दिवेआगरमध्ये 8 मुलांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Related Stories
Recommended image1
पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'
Recommended image2
Mumbai Pune Expressway : आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी; मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग 15 तास ठप्प
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved