MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'

पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी; रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केली 'डेडलाईन'

Pune-Mumbai Bullet Train Project: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पीक अवर्समध्ये दर १५ मिनिटांनी ट्रेन उपलब्ध असेल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 04 2026, 04:39 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणे मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी
Image Credit : x

पुणे-मुंबई बुलेट ट्रेनचे काऊंटडाऊन सुरू! १५ मिनिटांना मिळणार गाडी

पुणे : पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर आता तासांत नाही, तर मिनिटांत मोजले जाणार आहे! बहुप्रतिक्षित 'हायस्पीड बुलेट ट्रेन' प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकल्पाची गती आणि प्रवाशांना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा मोठा प्लॅन सादर केला.

25
५ वर्षांत स्वप्न होणार पूर्ण!
Image Credit : ANI

५ वर्षांत स्वप्न होणार पूर्ण!

मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आता 'मिशन मोड'वर काम सुरू केले आहे. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार:

मोठे प्रकल्प (बुलेट ट्रेन): पुढील ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

मध्यम प्रकल्प: ३ वर्षांच्या मर्यादेत पूर्ण होणार. मुंबई-पुणे हायस्पीड मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरू झाले असून, आगामी ५ वर्षांत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! खात्यात एकदम जमा होणार ४५०० रुपये; सरकारचा मोठा निर्णय काय?
Related image2
Mumbai Pune Expressway : आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी; मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग 15 तास ठप्प
35
दर १५ मिनिटांनी बुलेट ट्रेन; प्रवासाचा ताण मिटणार
Image Credit : Generated by google gemini AI

दर १५ मिनिटांनी बुलेट ट्रेन; प्रवासाचा ताण मिटणार

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांची फ्रिक्वेन्सी (वारंवारता). प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 'मेट्रो' स्टाईल नियोजन केले आहे.

"केवळ ट्रेन धावणार नाही, तर ती प्रवाशांना सहज उपलब्ध असेल. पीक अवर्समध्ये दर १५ ते २० मिनिटांनी एक बुलेट ट्रेन सोडण्याचे आमचे नियोजन आहे," असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांना वेळेचे बंधन राहणार नाही आणि अगदी लोकलसारखीच बुलेट ट्रेनची उपलब्धता असेल. 

45
महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 'बंपर' निधी
Image Credit : Gemini AI

महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 'बंपर' निधी

यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर केंद्र सरकारने निधीचा वर्षाव केला आहे.

महाराष्ट्रासाठी तरतूद: २३,९२३ कोटी रुपये.

एकूण प्रकल्प किंमत: राज्यात सध्या सुमारे १.७० लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 

55
काय होणार फायदा?
Image Credit : Getty

काय होणार फायदा?

१. वेळेची बचत: पुणे-मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.

२. आर्थिक विकास: या हायस्पीड कॉरिडॉरमुळे मार्गालगत औद्योगिक (Industrial) आणि निवासी (Residential) क्षेत्राला मोठी चालना मिळेल.

३. कनेक्टिव्हिटी: दर १५ मिनिटांनी ट्रेन असल्याने दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी जागतिक दर्जाची होईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
Recommended Stories
Recommended image1
LPG Crisis: महाराष्ट्रात गॅस तुटवडा का निर्माण झाला? छगन भुजबळांनी विधान परिषदेत मांडला 'मिशन LPG २.०' प्लॅन!
Recommended image2
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा
Recommended image3
कोकण रेल्वेची मोठी अपडेट! उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ; धावणार 'समर स्पेशल' गाड्या, पाहा पूर्ण वेळापत्रक
Recommended image4
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Recommended image5
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'; उकाड्यातून सुटका की संकट?
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! खात्यात एकदम जमा होणार ४५०० रुपये; सरकारचा मोठा निर्णय काय?
Recommended image2
Mumbai Pune Expressway : आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी; मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग 15 तास ठप्प
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved