सार

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शनिवारी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. जरांगे यांनी हिंगोलीतून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

 

Manoj Jarange Patil : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी हिंगोली जिल्ह्यात बोलताना राज्य सरकारला इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्या ज्या वेळी मराठा समाजावर संकट येतील त्या त्या वेळी हिंगोली जिल्हा ताकदीने पुढे येतो, हे या जिल्ह्याने दाखवून दिले आहे. माझे या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला सांगण आहे, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज मुलांसाठी रस्त्यावर आला आहे. एकट्या छगन भुजबळ यांचे ऐकून जर तुम्ही अन्याय केला तर याद राखा, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

'आरक्षण ही छगन भुजबळ यांची मक्तेदारी नाही, छगन भुजबळ यांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही. सरकारने आता शहानपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्याला आता त्रास सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारने हा आक्रोश समजून घ्यावा. जर भुजबळ यांचे ऐकून जर मराठ्यांवर अन्याय केला तर आता जसे झाले तसे पुन्हा होईल', असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारने मला उघड पाडायचे ठरवले

'मराठा आरक्षण शांततेत आहे. जोपर्यंत आपल्याला सहन होतंय तोपर्यंत करुया. राजकारणी लोक आपल्यात भांडण लावून देतील. काहींनी दंगली व्हाव्यात असे पेरले आहे, पण आपण तसे होऊ द्यायचे नाही. भुजबळांनी आपल्या विरोधात अनेकांना उभे केले आहे', असंही जरांगे पाटील म्हणाले. 'आता आम्ही २०० पाडू, यानंतर तुम्ही विचारच करत बसाल, असा टोलाही जरांगे यांनी लगावला. मी या समाजासाठी लढलो आहे, सरकारने मला उघड पाडायचे ठरवले आहे. माझी समाजाला विनंती आहे, मला उघड पडू देऊ नको. मला तुमच्या पाठबळाची आणि आशिर्वादाची गरज आहे', असंही जरांगे पाटील म्हणाले यावेळी जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा

Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट, 2 तासांच्या चर्चेत काय घडले?