Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट, 2 तासांच्या चर्चेत काय घडले?

| Published : Jul 06 2024, 12:12 PM IST

Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil

सार

Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.

 

 

Ashok Chavan Meets Manoj Jarange Patil : भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सरपंचाच्या घरी झालेल्या भेटीत तब्बल दोन तास चर्चा झाली. दरम्यान, चर्चा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भेटीत काय काय घडलं हे त्यांनी सांगितले आहे.

चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे काय म्हणाले?

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे सरकार ,समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिलं. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. सगेसोयरेची आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

अशोक चव्हाण काय काय म्हणाले?

आमचा सर्वांची इच्छा आहे हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा. आमच्या चर्चेत राजकीय चर्चेचा विषयच नव्हता. शासन आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा :

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'भुजबळ शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न करतील', मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल