- Home
- Maharashtra
- मुख्यमंत्र्यांनी जरागेंच्या कपाळी गुलाल लावला, ज्युस पाजला! आंदोलन यशस्वी झाल्यानंतरचे पाहा हे 10 PHOTOS
मुख्यमंत्र्यांनी जरागेंच्या कपाळी गुलाल लावला, ज्युस पाजला! आंदोलन यशस्वी झाल्यानंतरचे पाहा हे 10 PHOTOS
Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी विराट मोर्चा काढला होता. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी शनिवारी आपल्या आंदोलनाची यशस्वी सांगता केली आहे.
| Published : Jan 27 2024, 02:49 PM IST / Updated: Jan 27 2024, 05:51 PM IST
- FB
- TW
- Linkdin
Maratha Aarakshan : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मांडलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शनिवारी (27 जानेवारी) आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वाशी (Navi Mumbai Vashi) येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतला” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे सांगितले.
शनिवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आणि मोसंबीचा ज्युस पाजून त्यांचे उपोषणही सोडवले.
वाशी येथील शिवाजी चौकामध्ये दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला.
यानंतर पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेढा भरवला.
हा विजय सकल मराठा समाजाचा आणि त्याकरिता जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केले. तसेच गेले सात दिवस कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सकल मराठा समाजाचे कौतुक आणि अभिनंदन त्यांनी केले.
“मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली”, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे (Maratha Morcha) मागे घेण्याबाबत देखील तयारी दर्शवली. यासोबतच मराठा आंदोलनामध्ये जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हा विजय मराठा समाजाचा (Maratha Reservation) असून गुलाल उधळून आनंद साजरा करावा. तसेच सरकार आपल्यासोबत असल्याचे आवाहनही सकल मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण VIDEO
मनोज जरांगे यांची भेट..
🗓️ 27-01-2024📍वाशी https://t.co/ykt1SLNV3H— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024
आणखी वाचा:
Nitish Kumar : नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार? जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे
Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम