सार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी जरांगेंवर केलेल्या टीकेला जरांगेंनी प्रत्युत्तर दिले. नितेश राणे हे फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत असे वक्तव्य जरांगेंनी केले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर शांतता फेरी काढत असल्याचेही जरांगेंनी सांगितले.

Manoj Jarange on Nitesh rane: त्यांनी माझ्या दाढीवर नाही, सगळ्याच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. सगळ्या दाढी राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला. दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण आहे. मी त्यांचा आदर करतो. ते आता फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत असे म्हणत मराठा उपोषणकर्ते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नितेश राणेंना प्रत्यूत्तर दिले आहे.

मनोज जरांगेंनी राणेंवर केला पलटवार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे आणि राणे कुटुंबीय आमनेसामने आल्याचे पहायला मिळत आहे. एकमेकांवर उत्तर-प्रत्यूत्तरे, आरोप- प्रत्यारोप आणि बोचरी टीका करत आहेत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगेंचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जीना असा केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्यूत्तर दिले आहे.

मनोज जरांगेंची रविवारी पुण्यात शांतता रॅली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यभरात जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सोलापूर आणि सांगलीनंतर रविवारी ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी रविवारी मराठा आरक्षण शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार आहे

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

माझ्या दाढीवर नाही सर्वांच्याच दाढीवर आक्षेप घेतला असेल. सगळ्या दाढी राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला. दाढी ठेवणं हे मर्दाचे लक्षण आहे. मी त्यांना उत्तर देत नाही. मी त्यांचा आदर करतो. त्यांना आदर शब्दाचा अर्थच कळत नाही. ते जे बोलतात ते देवेंद्र फडणवीसची भाषा बोलतात. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. समाजाचा नाईलाज होईल असा इशारा मनोज जरांगेंनी नितेश राणेंना दिला.

राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही

मराठा आरक्षणाची त्यांना गरज नाही. बाकीच्यांना आहे की. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार असे जरांगे म्हणाले. राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारी मंडळी कोण होती हे मी पाहिले नाही. पण राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही. विनाकारण कोणी फडणवीसांसारखे सुपारी घेतल्यासारखे आंदोलन करणे, यात्रा काढणे बंद करा. आम्ही मुंबईला जाऊन जाब विचारू शकतो. समाजात ताकद आहे. आंदोलन सुरु नाही.

आणखी वाचा : 

गचांडीची भाषा?, राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना खोचक प्रत्युत्तर