दिवाळीच्या तोंडावर महावितरणने वीज दरात वाढ केली असून, ऑक्टोबरपासून नवीन दर लागू झाले आहेत. प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंतच्या या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
दिवाळीच्या तोंडावर महावितरणने दरवाढ करून महागाईचा झटका दिला आहे. ऑक्टोबरच्या बिलामध्ये प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांना मोठा तडाखा बसणार आहे. आपण सणासुदीवर खर्च करणार असाल तर वीज बिलाचा अतिरिक्त खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
ऑक्टोबरपासून नवीन दर लागू
१ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. १ जुलैपासून दर कमी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं पण आता परत एकदा दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर प्रति युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक युनिट वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहेत.
ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागणार
ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागणार आहे. विजेची दरवाढ येत्या काही महिन्यांमध्ये सुरूच राहणार आहे. या दरवाढीचा खरा फटका हा घरगुती ग्राहकांना बसणार आहे. या वीज दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करताना विचार करावा लागणार आहे. चार्जिंगसाठी ४५ पैसे अधिक द्यावे लागणार आहेत.


