- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, ५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा Yellow Alert!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, ५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा Yellow Alert!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाने जोर धरला असून, विदर्भात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागानुसार 9 सप्टेंबर मंगळवारी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/sFyjNyp2ZR
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 8, 2025
कोकणात पावसाचा जोर कमी, पण पावसाची शक्यता कायम
कोकणात पावसाने थोडा ब्रेक घेतला असला तरी, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठीही छत्री सोबत ठेवणे गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र: घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा: ढगांची वर्दळ कायम, पाऊस तुरळक
मराठवाडा भागात पावसाने कमी होण्याचे संकेत दिले असले, तरी छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात उघडीप, तरीही काही जिल्ह्यांत हलका पाऊस
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्याप्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर या भागात थोडी उघडीप मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा धोक्याचा इशारा
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार सरींची शक्यता आहे. दुसरीकडे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.
नागरिकांनी घ्यावी काळजी
9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात विदर्भात पावसाचा जोर अधिक, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसापर्यंतच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या स्थितीचा विचार करून शेती, प्रवास आणि दैनंदिन कामकाज नियोजन करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

