- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात रविवारी जोरदार पाऊस कोसळणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात रविवारी जोरदार पाऊस कोसळणार, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान अंदाज
Maharashtra Weather Alert: भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई: महाराष्ट्रात पावसाचा जोर काही केल्या कमी होण्याची चिन्हं नाहीत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार, तर इतर ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाबरोबर विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा सुद्धा अंदाज देण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa, Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/7gnT1DTkOy— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 20, 2025
मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण
मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी ढगाळ हवामान राहील, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 31°C तर किमान तापमान 26°C च्या आसपास राहील.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील अलर्ट जारी
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून, नाशिकचा घाट भाग, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस व वीजांचा गडगडाट होण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा: सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ: सर्व 11 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
विदर्भातही सर्व 11 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
सततच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. आगामी काळातही पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता असल्याने, शेतकऱ्यांनी आपली पिकं व माल सुरक्षित ठेवावेत, तसेच जीविताची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

