- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती, काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके जाणवणार! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अपडेट
Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची विश्रांती, काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके जाणवणार! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अपडेट
Maharashtra Weather Update: हवामान विभागाने 13 ऑक्टोबरला महाराष्ट्रभर कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला असून, राज्यात पावसाला ब्रेक मिळाला आहे. सोलापूर, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचे चटके तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.

काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता
मुंबई: 13 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रभर कोरडं हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाला पूर्णविराम मिळालाय. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे दुपारी उन्हाचे चटके अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता आहे.
ही आहेत राज्यातील गरम ठिकाणं!
सोलापूर, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यामुळे या भागात नागरिकांना दुपारी उन्हाच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.
कोकणात उन्हाची तीव्रता, पावसाचा मागमूस नाही
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहणार.
मुंबईचे तापमान: कमाल - 34°C, किमान - 22°C
पश्चिम महाराष्ट्रात ऊन तापणार
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथेही पावसाची शक्यता नाही.
पुण्यात तापमान: कमाल - 31°C, किमान - 19°C
मराठवाड्यात उष्णता टिकून राहणार
छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत कोरडे हवामान.
संभाजीनगरमध्ये तापमान: कमाल - 33°C, किमान - 18°C
उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारवा, दुपारी गरम
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही.
नाशिकचे तापमान: कमाल - 33°C, किमान - 16°C
सकाळी व रात्री हलकी थंडी जाणवण्याची शक्यता.
विदर्भात उन्हाचा जोर कायम
अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमध्येही कोरडे वातावरण.
नागपूरचे तापमान: कमाल - 31°C, किमान - 20°C
तापमानाचा उतार-चढाव सुरूच
राज्यात 13 ऑक्टोबर रोजी पावसाची कुठेही शक्यता नाही. मात्र, दुपारचं तापमान चढलेलं, आणि काही भागांत रात्री हलकी थंडी जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

