सार
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. हे सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत.
सोलापूर : भीमा नदी पात्रात बुडालेली बोट 17 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सापडली आहे. 35 फूट पाण्यात तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली आहे, मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप NDRF ला यश आलेले नाही. मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान ही बोट पाण्यात बुडाली होती. 17 तासानंतर बोट सापडली आहे. मात्र इतर सहा प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोचले असून स्थानिक बोटींच्या मदतीने शोध सुरु करण्यात आला आहे. या बोटमध्ये असलेला एक जण पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्यानंतर बचावकार्य सुरु झालं.
सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरु असताना ही दुर्घटना घडली होती. बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावाचा काठ गाठला. या घटनेची माहिती आमदार दत्तात्रय भरणेंही घेतली असून सध्या शोधमोहीम सुरु आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. निंबाळकर NDRF टीम सोबत जलाशयात उतरले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी अगोदर घटनेचा आढावा घेतला.
पाण्यात बुडालेल्या 6 जणांची नावे समोर
या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, कोमल दत्तात्रय जाधव वय 25, शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष, माही गोकुळ जाधव वय 3 (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे वय 35, गौरव धनंजय डोंगरे वय 16, (दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.