SSC Result 2024 : DigiLocker वरून अशी Download करा Digital १० वीची Result Copy

| Published : May 27 2024, 02:55 PM IST / Updated: May 27 2024, 02:56 PM IST

CBSE Board 12th Results 2024

सार

१० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकर ॲप, वेबसाईटसह इतर अनेक मार्गानी SSC बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल पाहू शकता. यंदा DigiLocker वर एसएससी निकालाची डिजिटल कॉपीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करू दिली जाणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागाअंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर निकाल जाहीर झाल्यानंतर पाहता येणार आहे.

विद्यार्थी ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, विविध मार्गानी अवघ्या काही स्टेप्स फॉलो करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. शिवाय, तांडा डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थी त्यांच्या निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड आणि सेव्ह करू शकणार आहेत.

DigiLocker च्या माध्यमातूनही विद्यार्थी विनादिक्कत डिजिटल पद्धतीने निकाल मिळवू शकतात. डिजिलॉकरवर लॉगिन केल्यानंतर MSBSHSE (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) द्वारे निकाल प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थी डिजीलॉकरवर त्यांचे निकाल तपासू शकतात. आपले बोर्डाचे निकाल कसे तपासावेत याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

 

 

DigiLocker द्वारे १० वीचे निकाल कसे तपासाला?

तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून MSBSHSE इयत्ता १० वी परीक्षेचे निकाल DigiLocker वर तपासू शकता शिवाय निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करून निकालाची डिजिटल प्रत DigiLocker मध्ये पुढील संदर्भासाठी सेव्ह करू शकता.

१) विद्यार्थ्यांनी, डिजीलॉकरवर निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट DigiLocker च्या digilocker.gov.in वर जा आणि लॉग इन करा.

२) तुमच्या डिजिलॉकर क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा किंवा तुमच्याकडे Login Credentials नसल्यास नवीन खात्यासाठी साइन अप करा.

३) दस्तऐवजाचा प्रकार निवडा, ' Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education' किंवा Maharashtra SSC Result 2024 प्रविष्ट करा.

४) MSBSHSE निकाल विभागात जा, जो सहसा "शिक्षण (Education)" किंवा "परिणाम (Results)" टॅब अंतर्गत आढळतो.

५) सूचनांनुसार तुमचा SSC परीक्षेचा सीट नंबर, शाळा क्रमांक आणि इतर महत्त्वाचे तपशील एंटर करा.

६) आधी लिंक केले नसल्यास तुमचा आधार क्रमांक लिंक करा.

७) एकदा आपण आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर, आपण आपला इयत्ता १० वीचा निकाल पाहू शकाल.

८) स्कोअरकार्ड डाउनलोड करा. शिवाय, हा निकाल तुम्ही तुमच्या डिजिलॉकर खात्यामध्ये सेव्ह करू शकता.

९) यंदा डिजिलॉकरच्या माध्यमातून दहावी च्या निकालाची डिजिटल प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आणखी वाचा:

SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81%, दहावीप्रमाणेच बारावीतही कोकण विभाग अव्वल