- Home
- Maharashtra
- Maharashtra School Holiday Update: कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maharashtra School Holiday Update: कोणत्या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maharashtra School Holiday Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. या परिस्थितीमुळे प्रशासनाने लोकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई
मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक आणि लोकल ट्रेनच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने उद्या, मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 साठी मुंबई आणि उपनगरात 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे मुंबई महापालिकेने सर्व सरकारी, खासगी आणि महानगरपालिकेच्या शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबई परिसरातील इतर जिल्हे
मुंबईप्रमाणेच परिसरातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे तेथेही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
नवी मुंबई
मुंबईपाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेनेही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
रायगड
रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पालघर
पालघरमध्येही जोरदार पाऊस सुरू असल्याने उद्या शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.
ठाणे, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली
ठाणे शहरात आज दुपारपासूनच शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पावसाचा अंदाज पाहता उद्यासाठीही ठाणे, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाची स्थिती पाहता, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि पालकांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे.

