MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द; पर्यटनाचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द; पर्यटनाचा प्लॅन करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

Goa Train Cancellation Summer: दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या घाट विभागात तांत्रिक कामामुळे २८ एप्रिल ते ७ जून या कालावधीत गोवा मार्गावरील ८ एक्स्प्रेस गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या आता वास्को-दा-गामा ऐवजी हुबळी स्थानकावर थांबतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 27 2026, 06:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबई गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द
Image Credit : Asianet News

मुंबई-गोवा रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! भर उन्हाळ्यात 'या' ८ एक्स्प्रेस गाड्या रद्द

मुंबई : मे महिन्याच्या सुट्टीत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने गोवा मार्गावरील ८ महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, काही गाड्यांचे मार्गही बदलले आहेत. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या घाटात चालणाऱ्या तांत्रिक कामामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
का घेतला रेल्वेने हा निर्णय?
Image Credit : ANI

का घेतला रेल्वेने हा निर्णय?

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या कॅसलरॉक ते कुलेम दरम्यानच्या घाट विभागात रेल्वे ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. २८ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ५ तासांचा मोठा 'ब्लॉक' घेतला जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. 

Related Articles

Related image1
बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद; 'ही' यादी तपासूनच घराबाहेर पडा!
Related image2
सावधान! तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूचे 'हे' रस्ते ३ दिवस बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय
35
या गाड्यांच्या प्रवासावर झाला परिणाम
Image Credit : South Western Railways - SWR

या गाड्यांच्या प्रवासावर झाला परिणाम

खालील गाड्या आता गोव्यातील वास्को-दा-गामा पर्यंत न जाता हुबळी (Hubballi) स्थानकावरच थांबतील आणि तेथूनच परतीच्या प्रवासाला निघतील.

शालिमार – वास्को दा गामा (18047/48)

तिरुपती/हैदराबाद – वास्को (17419/20, 17021/22)

सिकंदराबाद – वास्को (17039/40)

जैसिदीह – वास्को (17321/22)

महत्त्वाची सूचना: या बदलांमुळे गोवा, कर्नाटक आणि दक्षिण भारतात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आता हुबळी ते गोवा या प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. 

45
गाडीचा मार्ग बदलला!
Image Credit : South Western Railways - SWR

गाडीचा मार्ग बदलला!

वास्को दा गामा – वेलंकन्नी (17315/16) ही साप्ताहिक गाडी आता नेहमीच्या मार्गाऐवजी मडगाव – मंगळुरू – शोरनूर – एरोड या मार्गे धावेल. यामुळे हुबळी, धारवाड, दावणगेरे आणि बेंगळुरू यांसारखे महत्त्वाचे थांबे या फेरीसाठी रद्द करण्यात आले आहेत. 

55
प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांसाठी महत्त्वाचा सल्ला

ऐन पर्यटन हंगामात हा निर्णय आल्याने प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी आहे. तरीही, तुमचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (IRCTC) गाडीचे स्टेटस तपासा.

रेल्वे हेल्पलाइन किंवा अधिकृत ॲपवरून अद्ययावत माहिती घ्या.

शक्य असल्यास पर्यायी बस किंवा खासगी वाहनांचे नियोजन आधीच करून ठेवा. 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image2
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image3
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image4
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Recommended image5
Maharashtra Viral Video : रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित? तरुणाने मुलीचा वेश धारण करून केला प्रयोग
Related Stories
Recommended image1
बँकेची कामं खोळंबणार? उद्यापासून सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे राहणार बंद; 'ही' यादी तपासूनच घराबाहेर पडा!
Recommended image2
सावधान! तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूचे 'हे' रस्ते ३ दिवस बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी पाहा पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved