MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल? २०१९ नंतर जमीन घेणाऱ्यांनाही मिळणार लाभ? कृषीमंत्री दत्ता भरणे यांची मोठी घोषणा!

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल? २०१९ नंतर जमीन घेणाऱ्यांनाही मिळणार लाभ? कृषीमंत्री दत्ता भरणे यांची मोठी घोषणा!

Namo Shetkari Yojana: राज्य सरकार 'नमो शेतकरी महासन्मान निधी' आणि 'पीएम किसान' योजनेतील जाचक अटी बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 25 2026, 10:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल?
Image Credit : our own

नमो शेतकरी योजनेच्या निकषांत होणार बदल?

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. 'नमो शेतकरी महासन्मान निधी' आणि 'पीएम किसान' योजनेच्या जाचक अटींमुळे लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार आता सरसावले आहे. २०१९ नंतर जमिनीचे व्यवहार झालेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नेमका अडचण काय आहे? (१ फेब्रुवारी २०१९ ची अट)
Image Credit : Getty

नेमका अडचण काय आहे? (१ फेब्रुवारी २०१९ ची अट)

सध्याच्या नियमांनुसार, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमीन होती, त्यांनाच या योजनांचा लाभ मिळतो. मात्र, त्यानंतर ज्यांनी जमिनीची खरेदी केली, वाटणीपत्र झाले किंवा देणगीपत्राद्वारे जमीन नावावर झाली, त्यांना या लाभातून वगळण्यात आले आहे. यामुळे राज्यातील हजारो नवीन शेतकरी वर्षाकाठी मिळणाऱ्या १२ हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित आहेत.

"१ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी करणारे शेतकरी पात्र ठरत नाहीत, हा निकष बदलण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे आग्रही आहोत," असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. 

Related Articles

Related image1
पुणेकरांच्या घशाला उन्हाळ्यापूर्वीच कोरड! वानवडीत पाणी कपातीचा 'शॉक'; पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू
Related image2
Konkan Railway: कोकणचा प्रवास होणार आणखी सुखकर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठा बदल; वेटिंग लिस्टचं टेन्शन मिटणार!
35
नमो शेतकरी आणि पीएम किसान, आतापर्यंतची स्थिती
Image Credit : Getty

नमो शेतकरी आणि पीएम किसान, आतापर्यंतची स्थिती

कृषीमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेली आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

तपशील पीएम किसान योजना (२१ वा हप्ता) नमो शेतकरी योजना (७ वा हप्ता)

वितरण तारीख १९ नोव्हेंबर २०२५ ९ सप्टेंबर २०२५

लाभार्थी संख्या ९०.७४ लाख (राज्यभर) ४.९५ लाख (सोलापूर जिल्हा)

वितरित रक्कम १,८१४.७४ कोटी रुपये १,०२२.२८ कोटी रुपये 

45
पात्रतेसाठी केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष
Image Credit : Getty

पात्रतेसाठी केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष

पीएम किसान ही केंद्र पुरस्कृत योजना असल्याने, निकषांमध्ये बदल करण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारकडे आहे. राज्य सरकार केवळ केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहे. परंतु, राज्यातील वाढती शेतकरी संख्या आणि जमिनींचे होणारे हस्तांतरण पाहता, 'कट-ऑफ' तारीख बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जर केंद्राने याला हिरवा कंदील दिला, तर राज्यातील लाखो नवीन शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला १२,००० रुपये (केंद्र ६,००० + राज्य ६,०००) जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल. 

55
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
Image Credit : Getty

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे

सध्या लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) आणि आधार लिंकिंग अनिवार्य आहे.

निकष बदलल्यास नवीन जमीन धारकांना पुन्हा नोंदणीची संधी मिळू शकते.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune Jamavbandi : पुण्यात 14 दिवस जमावबंदी लागू; इंधन बचतीसाठी महापालिकेचे कठोर आदेश, अधिकाऱ्यांना ‘कारपूलिंग’ सक्तीचे
Recommended image2
अजित पवार गटाच्या नेत्याचा मागितला राजीनामा, नेमकं पक्षात काय घडलं?
Recommended image3
पुढील ९ दिवस धोक्याचे, या काळात नेमकं काय होणार?
Recommended image4
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image5
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Related Stories
Recommended image1
पुणेकरांच्या घशाला उन्हाळ्यापूर्वीच कोरड! वानवडीत पाणी कपातीचा 'शॉक'; पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू
Recommended image2
Konkan Railway: कोकणचा प्रवास होणार आणखी सुखकर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठा बदल; वेटिंग लिस्टचं टेन्शन मिटणार!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved