सार

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या मुख्यालयाजवळील आसपासच्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संबंधितच्या मार्गदर्शक सूचना नागपूर पोलीस आयुक्तांनी जारी केल्या आहेत.

Maharashtra :  नागपूरमधील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संबंधित नागपूरच्या पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे यांनी माहिती दिली आहे. अस्वती दोर्जेंनी म्हटले की, आरएसएस मुख्यालयाच्या (RSS Headquarter) आसपास हॉटेल्स, लॉज, कोचिंग क्लासेस आणि नागरिकांची खूप वर्दळ असते. 

आरएसएसच्या मुख्यालयाचे नागरिक फोटो आणि व्हिडीओ नागरिकांकडून काढले जातात. यामुळे आरएसएसच्या मुख्यालयाला धोका निर्माण होऊ शकतो. याच कारणास्तव आरएसएस मुख्यालयाच्या आसपासच्या संपूर्ण परिसरात ड्रोन उडवण्यास येत्या 28 मार्च पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यानंतर सुरक्षेसंबंधित आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असेही अस्वती दोर्जे यांनी म्हटले आहे.

28 मार्चपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी
नागपुर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, आरएसएसच्या परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीसाठी बंदी घालण्यात आली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी असणार आहे. कोणत्याही व्यक्तीने या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 188 अंतर्गत कार्यवाही केली जाईल. 29 जानेवारीपासून आरएसएस मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आरएसएसच्या मुख्यालयाला धोका
आरएसएस मुख्यालयाला याआधी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. डिसेंबर, 2022 मध्ये मुख्यालयाला बॉम्बने उडवू अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून दिली होती. यानंतर सुरक्षा यंत्रणांना असे काही इनपुट मिळाले आहेत ज्यामुळे आरएसएसच्या मुख्यालयाला धोका निर्माण होण्याचे संकेत असल्याचे दर्शवतात. 

गेल्या काही दिवसांपूर्वीच नागपूर पोलिसांनी आरएसएस मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात एक सर्व्हे केला होता. त्यानंतरच आता आरएसएस मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Manoj Jarange : शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे, वाचा मनोज जरांगेंच्या जाहीर सभेतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'लेक लाडकी योजने'चा शुभारंभ, Schemeचा असा घेता येईल लाभ

Swachh Survekshan : देशातील सुरत आणि इंदूर सर्वाधिक स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या ठिकाणांचाही समावेश