MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : रत्नागिरी, अहमदनर आणि बीड जिल्ह्यांला येलो अलर्ट; उर्वरित भागात हलक्या सरी कोसळणार

Maharashtra Rain Alert : रत्नागिरी, अहमदनर आणि बीड जिल्ह्यांला येलो अलर्ट; उर्वरित भागात हलक्या सरी कोसळणार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात मॉन्सूनच्या परतीदरम्यानही दमदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने आज (१७ सप्टेंबर) अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 17 2025, 08:36 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
राज्यात दमदार पावसाचा इशारा
Image Credit : ANI

राज्यात दमदार पावसाचा इशारा

मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच, राज्यात दमदार पाऊस कोसळत आहे. आज (ता. १७) राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

26
हवामानातील बदलते चित्र
Image Credit : Getty

हवामानातील बदलते चित्र

विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन, 19 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Related image2
बीडमधील शेतकऱ्याचा फोटो पाहून डोळ्यात येईल पाणी, नुकसानीचे पंचनामे सरकार करणार का?
36
पावसाची नोंद आणि तापमान
Image Credit : Getty

पावसाची नोंद आणि तापमान

मंगळवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जालना येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला, तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीनंतरही काही ठिकाणी उष्णतेचा त्रास कायम आहे. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

46
आजचा हवामान अंदाज
Image Credit : ANI

आजचा हवामान अंदाज

राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे.

56
मॉन्सूनची माघार
Image Credit : ANI

मॉन्सूनची माघार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. १४) पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मंगळवारी (ता. १६) मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागांतून, तसेच गुजरात, पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून माघार घेतली आहे. सध्या मॉन्सूनच्या परतीची सीमा भटिंडा, फतेहबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भूजपर्यंत पोहोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

66
हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
Image Credit : Getty

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

जोरदार वादळी पाऊस (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड.

विजांसह वादळी पाऊस (येलो अलर्ट) : रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Wedding Card: अमरावतीच्या लग्नपत्रिकेने नवा वाद, टिपू सुलतान-शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने चर्चांना उधाण!
Recommended image2
Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आजपासून 'मिसिंग लिंक' सुरू, जाणून घ्या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती
Recommended image3
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान, बिनविरोध निवडीची शक्यता
Recommended image4
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवाराची घोषणा; मुंबईतून झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब
Recommended image5
Vidhan Parishad Election 2026 : भाजपकडून पाच उमेदवारांची घोषणा; सोशल इंजिनिअरिंगसह निष्ठावंतांना संधी
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन, 19 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Recommended image2
बीडमधील शेतकऱ्याचा फोटो पाहून डोळ्यात येईल पाणी, नुकसानीचे पंचनामे सरकार करणार का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved