- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दोन आठवडे जोरदार पाऊस; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दोन आठवडे जोरदार पाऊस; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस राहणार असून, २१ सप्टेंबरपर्यंत विविध भागांत कमी-जास्त प्रमाणात सरी पडतील. कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
15

Image Credit : Getty
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील अनेक भागात आधीच सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला असून, काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
25
Image Credit : X
पावसाचा कालावधी आणि भागनिहाय अंदाज
- १८ ते २५ सप्टेंबर: तळकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
- २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर: दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता, कोकण किनारपट्टीसह बहुतांश भागांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज. विशेषतः कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
35
Image Credit : X
पुण्यात मुसळधार पाऊस आणि नागरिकांची दैना
गुरुवारी दुपारनंतर पुण्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारनंतर तीव्रतेने पाऊस बरसल्यानं सखल भागात पाणी साचले. वाहतुकीवर परिणाम झाला आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
45
Image Credit : X
पुढील चार दिवसांचा इशारा
- शुक्रवार: उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाडा आणि उत्तर विदर्भासाठी यलो अलर्ट.
- शनिवार-रविवार: सोलापूर आणि दक्षिण मराठवाडा याठिकाणी यलो अलर्ट जारी. हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि प्रवासात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
55
Image Credit : ANI
तज्ज्ञांचे निरीक्षण
मान्सून परतीच्या उंबरठ्यावर असला तरी, स्थानिक हवामान प्रणाली आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रतेमुळे राज्यात पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

