Laxman Hake Jalna Hunger Strike : 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही', सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

| Published : Jun 22 2024, 05:16 PM IST / Updated: Jun 22 2024, 05:19 PM IST

 laxman hakes hunger strike

सार

Laxman Hake Jalna Hunger Strike : राज्य सरकार ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून अधिवेशनाच्या काळात त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

 

Laxman Hake Jalna Hunger Strike : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावे.

या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावे.

अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिले आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केले आहे.

लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय आहेत?

1) ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले पाहिजे.

2) कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द करण्यात याव्यात.

3) ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी.

4) ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्हात योजना कार्यान्वित व्हावी.

5) ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.

आणखी वाचा :

बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया; मनसेची आदित्य ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी