- Home
- Maharashtra
- Ganesh Chaturthi Weather Alert 2025: गणेश चतुर्थीला राज्यात मुसळधार पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
Ganesh Chaturthi Weather Alert 2025: गणेश चतुर्थीला राज्यात मुसळधार पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
Ganesh Chaturthi Weather Alert 2025: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचं जोरदार आगमन होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी कोकण, घाटमाथा, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा सर्वाधिक प्रभाव मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/Ntoq7A0w30
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 26, 2025
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
कोकण व मुंबई परिसर, मुसळधार पावसाची शक्यता
यलो अलर्ट: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट आणि वीजांची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथ्यांवर पावसाचा जोर
पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
यलो अलर्ट: पुणे व कोल्हापूर (घाटमाथा परिसर)
ऑरेंज अलर्ट: सातारा (घाटमाथा भाग), अतिमुसळधार पावसाचा इशारा
मराठवाडा, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस
यलो अलर्ट: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
हलका ते मध्यम पाऊस: बीड, लातूर, धाराशिव
उत्तर महाराष्ट्र, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
यलो अलर्ट: नाशिक (घाटमाथा भाग), धुळे, नंदुरबार, जळगाव
विदर्भ, वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर
यलो अलर्ट: नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा
कोरडे जिल्हे (पाऊस नाही): अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम येथे स्वच्छ आकाश आणि उन्हाचे दर्शन होण्याची शक्यता
27 ऑगस्ट: राज्यात पावसाचा जोरदार प्रवेश
राज्यातील बहुतांश भागांत 27 ऑगस्ट रोजी पावसाचा जोरदार प्रकोप होणार असून, कोकण व घाटमाथा भागात अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांनुसार, नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा, आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
नागरिकांनी ही काळजी घ्यावी
विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा
प्रवासाआधी हवामानाची माहिती घ्या
नदी, ओढे, घाट रस्त्यांपासून दूर राहा
शालेय आणि धार्मिक कार्यक्रमांची योजना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन करा
गणेश चतुर्थीच्या दिवशी वातावरण प्रसन्न असो की ओलसर, बाप्पाचा उत्सव उत्साहात साजरा व्हावा, यासाठी सर्वांनी सुरक्षिततेचे भान ठेवणे गरजेचे आहे.

