सार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे यांनी त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले. मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार असून २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे किती आमदार निवडून येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेला मिळाला मोठा झटका -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता मोठा झटका मिळाला आहे. नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.नाशिक पश्चिम येथील सीमा हिरे यांना दातीर यांनी पाठींबा जाहीर केला आहे.
दातीर निवडणुकीसाठी होते इच्छुक -
दिलीप दातीर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण अचानक त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे ते नाराज झाले. त्यांच्या नाराजीमुळे अचानक त्यांनी भाजपाला पाठींबा जाहीर केला आहे. पक्ष आता त्यांच्यावर कोणती कारवाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.