सार

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्याचा निर्णय बदलला आणि आता त्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना पाडण्याचे आवाहन केले आहे. मराठा मतदारांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मनोज जरांगे यांचे आंदोलन बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मराठा उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होत. पण अचानक त्यांनी दुसऱ्या सहकारी पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे आपण निवडणुकीला कोणासही उभे केले नाही असं सांगितलं. आता त्याच मनोज जरांगे यांनी तुम्हाला ज्या उमेदवारांना पाडायचे आहे त्यांना पाडून टाका असं म्हटलं होत. 

जरांगे पाटलांचा येवला दौरा आला चर्चेत - 
मनोज जरांगे यांचा येवला दौरा चर्चेत आला आहे. येथून महायुतीकडून छगन भुजबळ हे उमेदवार असून जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद खूप दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे येथील जरांगे यांचा दौरा चर्चेत आला. त्यांनी येथे येऊन त्यांच्या दौऱ्याची सांगता केली. येथे आल्यानंतर मनोज जरांगे यांनी दोघांना पाडून टाका असा आदेशच दिला होता. यामध्ये दोघे म्हणजे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघांना पाडा असा आदेशच त्यांनी दिला होता. 

मराठा मतदार काय करणार? - 
मराठा मतदार यावेळी काय करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मराठवाडा भागातील उमेदवारांना यावेळी मोठा झटका बसला होता. त्यामुळे यावेळी हा झटका कोणाला बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलाय.