IMD Weather Alert : भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ ते ७२ तासांसाठी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील १६ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ ते ७२ तासांसाठी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशभरातील तब्बल १६ राज्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या नव्या इशाऱ्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
कोणकोणती राज्यं हाय अलर्टवर?
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस उत्तर-पश्चिम भारतात आणि पुढचे चार ते पाच दिवस मध्य भारतात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अलर्टमध्ये समाविष्ट राज्ये
उत्तर-पश्चिम भारत: पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश
मध्य भारत: मध्य प्रदेश, छत्तीसगढ
पूर्व भारत व ईशान्य भारत: झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा
दक्षिण भारत: तटीय कर्नाटक
पश्चिम भारत: महाराष्ट्र, राजस्थान
महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
महाराष्ट्रात कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात घरांमध्ये पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. तर गडचिरोली जिल्ह्यात तब्बल सहा तालुके मुख्यालयाशी तुटले होते. आता पुन्हा एकदा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काय काळजी घ्यावी?
निचांकी भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं
गरज नसल्यास प्रवास टाळावा
सरकारी सूचनांचे पालन करावं
विजेच्या तारांपासून आणि पाणथळ भागांपासून दूर राहावं
राज्यनिहाय इशारे व अलर्ट्स
राज्य इशारा प्रकारसंभाव्य धोका
महाराष्ट्र येलो अलर्ट मुसळधार पाऊस, पूरस्थिती
मध्य प्रदेश रेड अलर्ट अतिमुसळधार पाऊस
उत्तर प्रदेश येलो अलर्ट मध्यम ते जोरदार पाऊस
हिमाचल प्रदेश ऑरेंज अलर्ट ढगफुटीची शक्यता
नागालँड, मणिपूर येलो अलर्ट सततचा पाऊस, रस्ते बंद


