महाराष्ट्रातील ४८ पैकी ३६ खासदारांनी मराठीतून घेतली शपथ, हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे 'ते' १२ कोण?

| Published : Jun 25 2024, 02:02 PM IST

Maharashtra mp

सार

लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांना सभागृहाचे सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देण्यात आली. त्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह ४८ खासदारांनी शपथ घेतली.

 

नवी दिल्ली : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली.

राज्यातील ४८ खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली.

काँग्रेस

शोभा बच्छाव, धुळे - मराठी

बळवंत वानखेडे, अमरावती - मराठी

प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर - मराठी

कल्याण काळे, जालना - मराठी

वसंत चव्हाण, नांदेड - मराठी

वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य - मराठी

शिवाजी कालगे, लातूर - मराठी

छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर - मराठी

प्रणिती शिंदे, सोलापूर - हिंदी

गोवाल पाडवी, नंदूरबार - हिंदी

श्यामकुमार बर्वे, रामटेक - हिंदी

प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया - हिंदी

किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर - इंग्रजी

भाजपा

छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा - मराठी

मुरलीधर मोहोळ, पुणे - मराठी

रक्षा खडसे, रावेर - मराठी

स्मिता वाघ, जळगाव - मराठी

नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - हिंदी

अनुप धोत्रे, अकोला - हिंदी

पीयूष गोयल, उत्तर मुंबई - हिंदी

नितीन गडकरी, नागपूर - हिंदी

हेमंत सावरा, पालघर - इंग्रजी

शिवसेना - ठाकरे गट

संजय देशमुख, यवतमाळ वाशिम - मराठी

नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली - मराठी

संजय जाधव, परभणी - मराठी

राजाभाऊ वाजे, नाशिक - मराठी

संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई - मराठी

अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई - मराठी

अरविंद सावंत, दक्षिण मुंबई - मराठी

भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी - मराठी

ओमराजे निंबाळकर, धाराशिव - मराठी

राष्ट्रवादी शरद पवार गट

अमर काळे, वर्धा - मराठी

भास्कर भगरे, दिंडोरी - मराठी

सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी - मराठी

बजरंग सोनावणे, बीड - मराठी

सुप्रिया सुळे, बारामती - मराठी

अमोल कोल्हे, शिरूर - मराठी

ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा - मराठी

निलेश लंके, अहमदनगर - इंग्रजी

शिवसेना शिंदे गट

प्रतापराव जाधव, बुलढाणा - मराठी

संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर - मराठी

श्रीकांत शिंदे, कल्याण - मराठी

नरेश म्हस्के, ठाणे - मराठी

रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम - मराठी

श्रीरंग बारणे, मावळ - मराठी

धैर्यशील माने, हातकणंगले - मराठी

राष्ट्रवादी अजित पवार गट

सुनील तटकरे, रायगड - मराठी

अपक्ष

विशाल पाटील, सांगली - हिंदी

आणखी वाचा :

निलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, शेवटी रामकृष्ण हरी म्हणत जोडले हात