सार

Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीच्या जागेवर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. खरंतर, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. गुरुवारी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभेच्या जागेवरून गुरुवारी (18 एप्रिल) सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खरंतर, अजित पवारांच्या (Deputy CM Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना बारामतीच्या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. याच जागेवर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटातील खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तत्पूर्वी अजित पवारांनी सपत्नीक पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणतपीची पूजा केली.

सुनेत्रा पवारांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, “आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे. बारामती लोकसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार आहे. यामुळेच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा-प्रार्थना करत बाप्पाचे आशीर्वाद घेतले. सर्वांच्या सेवेसाठी आणि अजित पवारांसाठीही आशीर्वाद मागितला.”

अजित पवारांची दिली अशी प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले की, “मी बाप्पाकडे प्रार्थना केलीय ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडून येतील त्यावेळी महाराष्ट्रातून मोठे योगदान मिळालेले असेल. याशिवाय महायुतीचे अधिकाधिक उमेदवार राज्यातून निवडून येतील असा विश्वास आहे. आम्ही ठरवलेय की, महायुतीमधील कोणताही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाईल त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तेथे उपस्थितीत असतील. आम्ही आज सर्वांना उपस्थितीत राहण्यास सांगितले आहे. पण याचा अर्थ असा होत की, शक्ती प्रदर्शन असणार आहे.”

महायुतीची सभा
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) उपस्थितीत राहणार आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजल्यानंतर भरले जाणार असल्याचे बोलले जात आहेत.

सुप्रिया सुळेही बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
पुणे येथील कौन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुप्रिया सुळेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय शिरूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले शरद पवारांच्या गटातील उमेदवार अमोल कोल्हे (Amol Ramsing Kolhe) आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकरही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थितीत असणार आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर ; भाजपची 12 वी यादी प्रसिद्ध

शरद पवार भाजपात जाणार...? पक्षाच्या बड्या नेत्याने हसहसत दिले हे उत्तर