सार

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. सातारा मतदारसंघात उदयनराजे यांनी प्रचारालाही सुरूवात केली होती. भेटी गाठी, लोकांशी संवाद सुरू होता. परंतु महायुतीकडून अधिकृतरित्या सातारा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली नव्हती. परंतु बहुप्रतिक्षेनंतर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा मतदारसंघात नुकतेच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते मानले जातात. पक्षफुटीनंतरही शशिकांत शिंदे शरद पवारांसोबत कायम राहिले, मात्र याच मतदारसंघात महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता, उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, त्यासाठी राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. मात्र सातारा मतदारसंघाची उमेदवारी घोषणा होण्यास विलंब लागत होता.

पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला :

उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी या मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. श्रीनिवास पाटील आणि भाजपाकडून उदयनराजे भोसले यांच्यात ही लढत झाली. मात्र त्या लढतीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यानंतर भाजपाने उदयनराजेंची राज्यसभेवर निवड केली. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली. मात्र त्यांची उमेदवारी घोषित न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र आता ही उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपकडून उमेदवारी नाही तरी गुरुवारी भरणार होते अर्ज :

भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत होता. त्यामुळे अशा ही चर्चा होत्या की, राजे उमेदवारी जाहीर नाही झाली तरी अर्ज दाखल करणार होते. परंतु आता बहुप्रतिक्षेनंतर उमेदवारी जाहीर झाली आहे.

आणखी वाचा :

शरद पवार भाजपात जाणार...? पक्षाच्या बड्या नेत्याने हसहसत दिले हे उत्तर

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचा BJP ला रामराम, राजीनाम्यानंतर शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

वर्ध्यातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेचे परिवारावर गंभीर आरोप, पत्रकार परिषद घेत म्हणाल्या.…