काँग्रेसधमध्ये शरद पवारांना पक्ष करायचा होता विलिन पण.... संजय निरुपम यांनी केले हे खुलासे

| Published : May 09 2024, 10:13 AM IST / Updated: May 09 2024, 10:16 AM IST

Sanjay Nirupam

सार

Maharashtra Politics : काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी आपल्या एका विधानात शरद पवारांना आपला पक्ष काँग्रेमध्ये विलिन करायचा होता असे म्हटले आहे. याशिवाय संजय निरुमप यांनी काही खुलासेही केले आहेत.

Maharashtra Politics 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील तर काही काँग्रेममध्ये विलिन होतील असे विधान एका मुलाखतीत केले. यावरुनच संजय निरुपम यांनी एक विधान केले आहे. काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी म्हटले की, जर शरद पवारांना पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करायचा असल्यास काहीही फायदा होणार नाही. याशिवाय शून्याला शून्याशी जोडल्यास शून्यच येणार असेही संजय निरुपम यांनी म्हटले.

संजय निरुपम यांची काँग्रेसवर टीका
संजय निरुपम यांनी म्हटले की, काही वर्षांआधी शरद पवारांना काँग्रेसमध्ये पक्ष विलिन करायचा होता. यासाठी अनेकदा प्रयत्नही केले. पण सुप्रिया सुळेंना काँग्रेसने महाराष्ट्रात त्यांच्या हातात नेतृत्व करण्यास द्यावे अशी इच्छा होती. निवडणूक हरल्यास शरद पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करण्याचा विचार करू शकतात. पण मी पूर्ण ठामपणे सांगतो की, सुप्रिया सुळे महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम नाही. जरी विलिन झाल्यास शून्य अधिक शून्याचे गणित शून्यच होते.

शरद पवारांनी नक्की काय म्हटले होते?
शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत असे विधान केलेयं की, पुढील काही वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक जवळ येतील. अथवा काँग्रेससोबत विलिन होण्याचा विचार करू शकतात. याबद्दल पक्षाला योग्य वाटत असल्यास तसे होऊ शकते.

शरद पवारांनी पुढे म्हटले की, "मला काँग्रेस आणि आमच्यामध्ये काही फरक आहे असे वाटत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरू यांच्या विचारसणींचे आहोत. दरम्यान, मी सध्या काहीही करत नाहीये. कोणताही मोठा निर्णय सामूहिक रुपात घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे कठीण आहे."

शरद पवारांनी निवडणुकीवरून केले हे विधान
वर्ष 2024 च्या निवडणुकीची तुलना याआधीच्या निवडणुकांसोबत करत शरद पवारांनी म्हटले की, राजकीय पक्षांमधील एक मोठा वर्ग भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंत करत नाही. देशाचा मूड मोदींच्या विरोधात होत आहे. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांचे पालन करत सकारात्मक दिशेने पुढे जात आहोत.

आणखी वाचा : 

ईव्हीएम हॅक करण्यासाठी उबाठा नेते अंबादास दानवेंना अडीच कोटींची मागणी, आरोपी जवानाला अटक

मोठी बातमी ! काँग्रेसला सोडचिठ्ठी देत संजय निरुपम यांनी 19 वर्षानंतर पुन्हा हाती घेतले शिवधनुष्य

Read more Articles on