सार

First Phase Voting : महाराष्ट्रात 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच गडचिरोलीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून कठोर व्यवस्था करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पाच जागांसाठी होणार आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपूरसह गडचिरोली-चिमूरच्या जागांचा समावेश आहे. चंद्रपुर आणि गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा अधिक दबदबा असल्याने येथे शांततेत निवडणूक होण्यासाठी प्रशासनाकडून कठोर व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये शुक्रवारी (19 एप्रिल) मतदान होणार आहे.

गडचिरोलीत मतदानाआधी कठोर सुरक्षाव्यवस्था
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले की, आम्ही गेल्या सहा महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विस्तृत तयारी केली आहे. उद्या होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 15 हजार सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मतदानासाठी एकूण 206 मतदान बूथ आहेत. याशिवाय हवाई दलाचे 6Mi-17 हेलिकॉप्टरही असणार आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात ईव्हीएम आणि मतदान पार्ट्यांचे हेली-ड्रॉपिंग करण्यात आले आहे. 130 ड्रोन आकाशातून मतदानाच्या ठिकाणी लक्ष ठेवणार आहेत. यामुळे मतदारांनी कोणत्याही भीतीशिवाय मतदान करण्यासाठी येण्याचे आवाहनही नीलोत्पल यांनी केले आहे.

वर्ष 2008 मध्ये अस्तित्वात आली गडचिरोली-चिमूर सीट
वर्ष 2008 मध्ये गडचिरोली-चिमूरची सीट अस्तित्वात आली आहे. याआधी चिमूर लोकसभेची जागा होती. गडचिरोली- चिमूर लोकसभेच्या जागेमध्ये गडचिरोतील तीन विधानसभेच्या जागा आहेत. यामध्ये गडचिरोली, आरमोरी आणि अहेरीच्या जागेचा समावेश आहे. तर चंद्रपुर जिल्ह्यात दोन विधानसभेच्या जागा आहेत. यामध्ये चिमूर आणि ब्रम्हपुरी जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्यातील एक विधानसभेची जागा आमगावात येते.

वर्ष 2009 मध्ये काँग्रेसचा विजय
गडचिरोली-चिमूरच्या जागेवर वर्ष 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार मारोतराव कोवासे यांचा विजय झाला होता. कोवासे यांनी भाजपच्या अशोक नेते यांचा पराभव केला होता.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. या जागांवर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे.

आणखी वाचा : 

बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरण्याआधी अजित पवारांनी सपत्नीक केली दगडूशेठच्या मंदिरात पूजा, सुनेत्रा पवार म्हणाल्या....

शरद पवार भाजपात जाणार...? पक्षाच्या बड्या नेत्याने हसहसत दिले हे उत्तर