सार

लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा दावा देखील अमित शाह यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकरणात उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. यावरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका खासगी वृत्तसंसथेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांना महाराष्ट्रात भाजप किती जागांवर विजय मिळवेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अमित शाह यांनी उत्तर देत म्हटले की, भाजपचा राज्यात 41 पेक्षा अधिक जागांवर विजय होईल.

इंडिया आघाडीवर अमित शाह यांची टीका
अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जागांच्या विजयाच्या दाव्यासह इंडिया (I.N.D.I.A) आघाडीवरही टीका केली. इंडिया आघाडी सातत्याने भाजपवर (BJP) राजकीय पक्ष मोडत असल्याचे आरोप करते. पण आम्ही कोणताही राजकीय पक्ष मोडलेला नसल्याचे अमित शाह यांनी म्हटले. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पुत्र-प्रेमापोटी मोडला गेला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना योग्य सन्मान दिला असता शिवसेनेत कधीच फूट पडली नसते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली ती शरद पवारांच्या पुत्र प्रेमापोटीच. राष्ट्रवादीमध्येही अजित पवारांना (Ajit Pawar) योग्य सन्मान दिला असता तर आज ते पक्षासोबत असते. आमच्यासोबत आले नसते. यामुळे पुत्र-प्रेमापोटी सध्या राजकीय पक्षात फूट पडली जात असल्याचे लक्षात घ्यावे आणि त्यानंतरच भाजपवर टीका करावी असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष
अमित शाह यांना महाराष्ट्रात तुम्ही किती जागांवर निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अमित शाह यांनी उत्तर देत म्हटले की, अद्याप किती जागांवर निवडणूक लढवणार हे ठरवण्यात आलेले नाही. पण भाजप महाराष्ट्रातील एक मोठा पक्ष असल्याचे अमित शाह यांनी म्हटले. 

एनडीएमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम
महाराष्ट्रात अद्याप एनडीएमध्ये (NDA) सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरलेला नाही. 20 जागांवर भाजपकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातील 18 जागांसाठी या उमेदवारांचा विचार, आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती