Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातील 18 जागांसाठी या उमेदवारांचा विचार, आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक

| Published : Mar 21 2024, 08:21 AM IST / Updated: Mar 21 2024, 08:48 AM IST

Congress
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून राज्यातील 18 जागांसाठी या उमेदवारांचा विचार, आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. यंदा राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. अशातच महाविकास आघाडीमधील सीट शेअरिंगचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याशिवाय राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. अशातच महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. गुरुवारी (21 मार्च) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात बैठक होणार आहे.

काँग्रेस 19 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता
काँग्रेस (Congress) राज्यात 18 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार वेगवेगवेळ्या मित्रपक्षांसोबत झालेल्या आतापर्यंतच्या चर्चेनुसार, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. याशिवाय शरद पवार यांचा पक्ष सहा जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी
काँग्रेसच्या सूत्रांनुसार, पक्षाकडून जारी केली जाऊ शकते पुढील उमेदवारांची संभाव्य यादी- 

  • अमरावती - बळवंत वानखेडे
  • नागपूर - विकास ठाकरे
  • सोलापूर -प्रणिती शिंदे
  • कोल्हापूर - शाहू छत्रपती
  • पुणे - रवींद्र धंगेकर
  • नंदुरबार - गोवाल पाडवी
  • भंडारा-गोंदिया - नाना पटोले
  • गडचिरोली - नामदेव किरसान
  • अकोला - अभय पाटील
  • नांदेड - वसंतराव चव्हाण
  • लातूर - डॉ. शिवाजी कलगे
  • भिवंडी - दयानंद चोरगे
  • रामटेक - रश्मी बर्बे
  • चंद्रपूर - विजय वडेट्टीवार

दरम्यान, भंडारा-गोंदिया येथून काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. पण अद्याप अखेरचा निर्णय होणे शिल्लक आहे.

काँग्रेसच्या उमेदवारांच्या दोन यादीत 82 नावांची घोषणा
आतापर्यंत काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या दोन यादी जाहीर केल्या आहेत. या यादीमध्ये 82 नावांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. दुसरी यादी काँग्रेसने 12 मार्चला जारी केली होती. यामध्ये 43 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ याला छिंदवाडा येथून तिकिट दिले गेले. याशिवाय राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत याला जालौर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

याआधी 8 मार्चला काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जारी केली होती. या यादीमध्ये 39 नावांची घोषणा केली होती. यामुळे आतापर्यंत काँग्रेसकडून 82 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

Mumbai Railway Stations Name : मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांना मिळणार ही नवी नावे, महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Read more Articles on