- Home
- Maharashtra
- Lalbaugcha Raja First Look : 'बाप्पा आला रे!', लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?
Lalbaugcha Raja First Look : 'बाप्पा आला रे!', लालबागच्या राजाचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का?
Lalbaugcha Raja First Look : लालबागच्या राजाचा पहिला देखावा प्रदर्शित झाला असून, भाविकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या शुभदिनी गणराज घरोघरी आणि मंडपात विराजमान होतील.

मुंबई : ज्या क्षणाची संपूर्ण मुंबईसह देशभरातील भाविक आतुरतेने वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण अखेर समोर आलाय! लालबागच्या राजाचा पहिला देखावा (First Look) अखेर प्रदर्शित झाला असून, 'लालबागचा राजा' यंदा कसा विराजमान झाला आहे, हे पाहून भाविकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
२७ ऑगस्टला गणेश चतुर्थी, उत्सवाला सुरुवात
यंदा २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या शुभदिनी गणराज घरोघरी आणि मंडपात विराजमान होतील. त्याआधीच, गणेशभक्तांच्या मनाचा राजा लालबागचा राजा आपल्या पहिल्या दर्शनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
लालबागचा राजा, एक श्रद्धेचा महापूर
गेल्या अनेक दशकांपासून 'नवसाला पावणारा' म्हणून ओळखला जाणारा लालबागचा राजा केवळ मुंबईतच नव्हे, तर देशभरातल्या गणेशभक्तांचा श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याचा पहिला लूक समोर येताच भक्तांनी जल्लोषात स्वागत केलं आहे
गणेशोत्सवाची सुरुवात म्हणजे लालबागच्या राजाची चर्चा अनिवार्य
गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात झाली की, सर्वात पहिले नाव घेतले जाते ते लालबागच्या राजाचेच. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यातही लालबागचा राजा हा भक्तांच्या मनामध्ये एक वेगळीच श्रद्धा जागवतो.

