MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Ganesh Chaturthi 2025 : तळलेल्या मोदकांना असा आणा कुरकुरीतपणा, सगळेच कौतुक करतील!

Ganesh Chaturthi 2025 : तळलेल्या मोदकांना असा आणा कुरकुरीतपणा, सगळेच कौतुक करतील!

मोदक म्हणजे स्वर्गीय सुख. फक्त खाण्याचेच नव्हे तर प्रसादासाठी मोदक बनविण्याचे सुखही वेगळेच असते. पण या मोदकांना कुरकुरीतपणा कसा आणायचा हे खरे आव्हान असते. तर जाणून घ्या...

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 23 2025, 01:05 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
२१ मोदकांचा नैवेद्य
Image Credit : fb

२१ मोदकांचा नैवेद्य

घरच्या घरी मोदक बनवायला महिलांना खूप आवडते, पण ते कुरकुरीत कसे करायचे हीच चिंता असते. म्हणून आज आपण जाणून घेऊ या की मोदक कुरकुरीत, चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट कसे बनवावे.

गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात मोदक बनवले जातात. गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात, म्हणूनच सणाच्या दिवशी २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. मोदक अनेक प्रकारे तयार केले जातात. उकडीचे मोदक, तळलेले मोदक, चॉकलेट मोदक, ड्रायफूट मोदक फार प्रसिद्ध आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मोदक करण्याची पद्धत
Image Credit : fb

मोदक करण्याची पद्धत

पोळी बनवण्यासाठी : १०० ग्रॅम चिरोटी रवा, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तूप, चिमूटभर मीठ घ्यावे. सुरुवातीला पाणी न घालता मिसळून घ्यावे. हळूहळू पाणी घालून पिठ मळून घ्यावे. वरून थोडासा मैदा भुरभुरवून ठेवावा.

Related Articles

Related image1
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
Related image2
घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवावे?
35
सारण तयार करण्यासाठी :
Image Credit : fb

सारण तयार करण्यासाठी :

  • कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात थोडे काजू-बदाम घालून परतावे.
  • मग किसलेले नारळ घालून हलवावे.
  • त्यात गुळ घालावा. दोन मिनिटांत गुळ पाणी सोडेल. अजून पाणी घालू नये.
  • नंतर १ टेबलस्पून चिरोटी रवा टाकल्यास सारण घट्ट आणि छान होते.
  • वरून चिमूटभर वेलची पूड घालून थंड होऊ द्यावे.
  • या प्रमाणात १०–११ मोदक तयार होतात.
45
तळण्यासाठी :
Image Credit : fb

तळण्यासाठी :

  • आधी मळलेली कणिक पुन्हा पोळीच्या पिठासारखी मळून लहान लहान गोळे करावेत.
  • गोळा थोडा लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा.
  • दुकानात मिळणारे साचे वापरले तर आकार नीट येतो.
  • तेल जास्त गरम न करता मध्यम आचेवर मोदक तळावेत.
  • असे केले तर कुरकुरीत, खमंग मोदक नैवेद्यासाठी तयार होतात.
55
मोदक बनवण्याच्या काही टिप्स
Image Credit : fb

मोदक बनवण्याच्या काही टिप्स

  • नेहमी चांगल्या दर्जाचे ताजे पीठ वापरावे.
  • खूप पाणी घालू नये, फक्त पुर्‍याच्या पिठासारखे घट्ट पीठ करावे.
  • मैदा घातल्याने मोदक कुरकुरीत होतात.
  • चिरोटी रवा सारणात घातल्यास ते घट्ट राहते, चिकटत नाही.
  • तेल खूप तापवू नये, मध्यम आचेवरच मोदक तळावेत.
  • परफेक्ट आकारासाठी साचे वापरता येतात.
  • तळलेले मोदक जास्त दिवस टिकतात, पण वाफवलेले मोदक फक्त त्याच दिवशी खाल्लेले बरे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
फूड न्यूज
गणेशोत्सव 2025
मोदक

Recommended Stories
Recommended image1
Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा
Recommended image2
Tata Motors Festive Offers 2026 : टाटाच्या कार्सवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत
Recommended image3
Toyota Car Offers: टोयोटाच्या गाड्यांवर १३ लाखांपर्यंतची बंपर सूट!
Recommended image4
UPI MDR Charges : यूपीआय युजर्ससाठी मोठी बातमी; MDR शुल्क कधी लागू होणार? वाचा सविस्तर
Recommended image5
Top 5 Smartwatches 2026 : सणासुदीला स्मार्टवॉच घेताय? मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही टॉप ५ घड्याळे पाहा
Related Stories
Recommended image1
उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?
Recommended image2
घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवावे?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved