- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana e-KYC: एक चुकीचा क्लिक आणि खाते रिकामं!, फक्त 'ही' खबरदारी ठेवली की वाचाल मोठ्या स्कॅमपासून
Ladki Bahin Yojana e-KYC: एक चुकीचा क्लिक आणि खाते रिकामं!, फक्त 'ही' खबरदारी ठेवली की वाचाल मोठ्या स्कॅमपासून
Ladki Bahin Yojana e-KYC: लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, बनावट वेबसाइट्समुळे महिलांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे, ज्यामुळे बँक खाते रिकामे होऊ शकते.

तुमची छोटीशी चूक महागात पडू शकते
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची मदत सुरूच ठेवायची असेल, तर आता e-KYC प्रक्रिया अनिवार्य आहे. सरकारने दोन महिन्यांची डेडलाईन दिली आहे. पण या प्रक्रियेत महिलांना सर्वात मोठा धोका बनावट वेबसाइट्समधून येतोय. चुकीने माहिती दिल्यास बँक खाते रिकामं होण्याची वेळ येऊ शकते!
e-KYC चा नवा नियम – पण का?
महिला व बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक लाभार्थीने दरवर्षी जून महिन्यापर्यंत e-KYC करणे बंधनकारक राहील.
तपासणीत 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा पर्दाफाश झाला आहे, ज्यात पुरुषांचाही समावेश होता.
वास्तविक हक्कदार महिलांपर्यंतच योजना पोहोचावी, यासाठी डिजिटल पडताळणी आवश्यक ठरली.
यामुळे गैरव्यवहार थांबणार असून सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता येईल.
फक्त अधिकृत पोर्टलवरूनच करा e-KYC
सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
e-KYC प्रक्रिया केवळ https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या पोर्टलवरच करा.
गूगलवर दिसणाऱ्या इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
बनावट वेबसाइट्सचा वाढता धोका
गेल्या काही दिवसांत hubcomut.in सारख्या खोट्या वेबसाइट्स समोर आल्या आहेत. या साइट्सवर एकदा माहिती दिली, तर
बँक खाते हॅक होण्याची शक्यता
पैसे चोरीला जाण्याचा धोका
वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका
यामुळे महिला आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकू शकतात.
पात्रता कोणासाठी?
वय: 21 ते 65 वर्षे महिला
वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपर्यंत
लाभ: दरमहा थेट बँकेत ₹1,500 मदत
सध्या, तब्बल 2.25 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत.
e-KYC का अत्यावश्यक?
अपात्र आणि खोट्या नावावर चालणारा गोरखधंदा थांबवण्यासाठी
थेट वास्तविक महिलांच्या खात्यात मदत पोहोचण्यासाठी
सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी
भविष्यात डिजिटल पडताळणीद्वारे इतर योजना जलद गतीने जोडण्यासाठी
खबरदारीच उपाय!
लाडकी बहीण योजनेतून खरोखरचा लाभ घ्यायचा आहे, तर एकच नियम लक्षात ठेवा. फक्त अधिकृत पोर्टलवरच e-KYC करा. चुकीचा क्लिक तुम्हाला आर्थिक संकटात ढकलू शकतो. तुमची छोटीशी चूकच तुमच्या कष्टाच्या कमाईवर घाला आणू शकते.

