- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?
Ladki Bahin Yojana : या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता, कारण काय?
Majhi Ladki Bahin Yojana August-September 2025 Update: अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. लाखो महिलांना हे हप्ते मिळणारच नाहीत कारण त्यांनी निकषांचे उल्लंघन करून अर्ज भरले आहेत आणि त्यांची पडताळणी सुरू आहे.

मुंबई : राज्यातील अनेक महिलांना "माझी लाडकी बहीण" योजनेच्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे हप्ते अजूनही मिळालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहीजणी विचारत आहेत की हे दोन हप्ते एकत्र येणार का? तर काहींना यावेळी हप्ताच मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
हप्ते उशीराने का?
सप्टेंबर महिना सुरू झाला असतानाही ऑगस्टचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे “लाडकी बहीण” योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, लाखो महिलांना यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते मिळणारच नाहीत, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या महिलांना मिळणार नाही हप्ता, कारण काय?
"लाडकी बहीण" योजनेसाठी शासनाने काही स्पष्ट निकष ठरवले आहेत. हे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. पण, अनेक महिलांनी नियमांचे उल्लंघन करत अर्ज भरले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून, त्यांना हप्ता मिळणार नाही.
२६ लाख महिलांची पुन्हा पडताळणी
राज्यात तब्बल २६ लाखांहून अधिक महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. याची माहिती खुद्द आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या या महिलांची पुन्हा पडताळणी सुरू आहे.
अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत. या वेळी तपासले जाणारे मुद्दे
घरात योजनेचे किती लाभार्थी आहेत
कोणी टॅक्स भरतो का?
वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांच्या आतील आहे का?
या तपासणीनंतरच महिला पात्र किंवा अपात्र ठरवल्या जात आहेत. अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.

