- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana Update: गणपती विसर्जनापूर्वी मिळणार का लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट-सप्टेंबरचे पैसे?, जाणून घ्या नवी अपडेट
Ladki Bahin Yojana Update: गणपती विसर्जनापूर्वी मिळणार का लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट-सप्टेंबरचे पैसे?, जाणून घ्या नवी अपडेट
Ladki Bahin Yojana 2025 Latest News: लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नाही. सणासुदीच्या काळात हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या लाखो महिलांना अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. गणेशोत्सवाचा उत्सव सुरु असतानाही खात्यात पैसे न आल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे!
महिलांमध्ये नाराजी, पण येऊ शकतो दिलासा
"लाडकी बहीण" योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक महिलांच्या खात्यात ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. सणासुदीचा काळ असूनही लाभ न मिळाल्यामुळे महिला नाराज आहेत. बाप्पाचा विसर्जन दिवस जवळ आला तरीही ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही.
मात्र आता वृत्त असे आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते म्हणजेच एकूण 3,000 रुपये या महिन्यातच जमा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र येणार की वेगवेगळ्या तारखांना हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पडताळणीचा फटका आणि तांत्रिक अडचणी
या योजनेतील पडताळणीमुळे अनेक महिलांना हप्त्यांपासून वंचित रहावे लागले आहे. काही महिलांचे अर्ज निकषांमध्ये न बसल्याने रद्द झाले, तर काहींना तांत्रिक अडचणींमुळे हप्ते मिळालेले नाहीत.
मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक नोंदणी झाली होती. मात्र, खात्रीशीर तपासणीनंतर हा आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला. जर स्क्रूटिनी केली नसती, तर चुकीचे लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिकच राहिली असती.”
बोगस लाभार्थ्यांवर कारवाई
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी असताना, सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी, तसेच हजारो पुरुषांनी बनावट नोंदणी करून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणांवर सरकारने गंभीर दखल घेतली असून कारवाई होणार असल्याचेही मंत्री तटकरेंनी जाहीर केले आहे.

