- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता केव्हा येणार?, आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता केव्हा येणार?, आदिती तटकरे यांनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याची घोषणा केली असून, ₹344 कोटींचा निधी वितरित केला जात आहे. हप्ता मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

मुंबई: महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक आधार ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी अद्याप खात्यावर जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंता होती. मात्र आता या संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून वितरित होणार आहे. यासाठी एकूण ₹344 कोटींचा निधी वितरित केला जात आहे.”
हप्ता मिळवण्यासाठी 'या' अटी पूर्ण असणे आवश्यक
महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असली तरी यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण असणे गरजेचे आहे.
बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक
KYC प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे
इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आले आहे
वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही
इतर राज्यात स्थलांतर झालेल्या (लग्नानंतर) महिलांनाही योजना लागू नाही
२ कोटी ४८ लाख महिला लाभार्थी, परंतु अनेक अर्ज बाद
या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. सध्या या योजनेअंतर्गत २.४८ कोटी महिलांची नोंदणी आहे. मात्र, यामध्ये बऱ्याच महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत. आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट सांगितले की, “अनेक महिलांनी निकष पूर्ण न करता अर्ज केले होते. त्यामुळे फेरतपासणीनंतर त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.”
तुमचा हप्ता मिळाला नाही? तर हे करा
जर अजूनही तुमच्या खात्यावर हप्ता जमा झाला नसेल, तर खालील गोष्टी तपासा
आधार लिंक आहे का?
KYC पूर्ण झाली आहे का?
तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का?
यासाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025

