- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी योजनेत भ्रष्टाचार, गडबड झाल्याचा आरोप केला, तर शिंदेंनी योजना बंद होणार नाही आणि २१०० योग्य वेळी दिले जातील असे आश्वासन दिले

२१०० रुपये नेमके कधी मिळणार?
मुंबई : लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली आणि या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर देत अनेक स्पष्ट भूमिका मांडल्या. “लाडकी बहिणींच्या पैशात तुम्हीच अडथळे आणले, आणि त्या बहिणींनीच तुम्हाला निवडणुकीत उत्तर दिलं,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. उपनगरातून विधानसभेपर्यंत झालेल्या चर्चेत त्यांनी स्पष्ट संदेश दिला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही! जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल.
“इतिहासात बघा – इतकी धाडसी योजना कोणी कधी केली का?”, शिंदे यांचे विरोधकांना सवाल
विरोधकांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्या घसरल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर शिंदेंनी प्रत्युत्तर दिले.
“लाभार्थी संख्या कमी म्हणजे गडबड, भ्रष्टाचार, चुका – हे तुमच्या कारभाराचे परिणाम.”
“राजकारण, मतांसाठी राज्य लुटलं ते तुम्ही. आणि आता आम्हाला धडे देता?”
“काँग्रेसच्या दीर्घ काळातील सरकारने अशी योजना केली का?”
त्यांनी पुढे सांगितले, “लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते, आणि ती आमच्याकडे आहे.”
विरोधकांकडून आरोप, ‘फ्रॉड’, ‘गडबड’, ‘भ्रष्टाचार’
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की,
लाभार्थी संख्या घटणे म्हणजे गडबड
पासिंग, भ्रष्टाचार, चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी
सत्ताधाऱ्यांचे समाधानकारक उत्तर नाही
यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला.
“न्यायालयात गेलात, पण कोर्टानेच तुमच्या पाठीवर थाप न देता फटकारले” – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंनी टीका करताना विरोधकांना आठवण करून दिले.
“योजना सुरू झाल्यावर तुम्हीच न्यायालयात गेलात.”
“अनिल वडपल्लीवार कोणाचा समर्थक होता? नाना पटोले यांचा.”
“योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात धाव घेतली, पण न्यायालयानेच तुमचा दावा फेटाळला.”
ते पुढे म्हणाले, “ही योजना फसवी, जुमला असे तुम्ही म्हणालात, पण आचारसंहितेपूर्वी आम्ही बहिणींना आगाऊ पैसे देऊन दाखवले, ही आहे आमची भूमिका.”
२१०० रुपये कधी मिळणार?, शिंदे यांची स्पष्ट भूमिका
उपमुख्यमंत्री म्हणाले, “लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने सुरू केली.”
“आम्ही सांगितलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार.”
“२१०० रुपयांचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता आहात, पण योग्य वेळ आली की आम्ही वचन पूर्ण करू.”
शेवटी त्यांनी पुन्हा विरोधकांवर पलटवार केला.
“तुम्ही योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनीच तुम्हाला जोडा दाखवला.”

