- Home
- Mumbai
- Mumbai Local Update : सावधान! लोकलमध्ये 'विनातिकीट' प्रवास करताय? आजच सुधारा, रेल्वेने दंडासोबत शिक्षेचे नियम बदलले!
Mumbai Local Update : सावधान! लोकलमध्ये 'विनातिकीट' प्रवास करताय? आजच सुधारा, रेल्वेने दंडासोबत शिक्षेचे नियम बदलले!
Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये बनावट तिकिटांच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाने मासिक पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले. या नव्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विनातिकिट प्रवास करणाऱ्यांवर मध्य व पश्चिम रेल्वे संयुक्तपणे कायदेशीर कारवाई करत आहे.

लोकलमध्ये 'विनातिकीट' प्रवास करताय? आजच सुधारा
मुंबई : मुंबई लोकलमध्ये फेक तिकिटे आणि विनातिकिट प्रवासाच्या घटना वाढत असल्याने रेल्वे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. अनेक प्रवासी UTS ॲपवरून बनावट तिकिटे दाखवत प्रवास करत असल्याचे आढळून आल्यानंतर तिकीट निरीक्षक (TC) आता अधिक कडक कारवाई करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मासिक पास घेणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवा आणि महत्त्वाचा नियम लागू केला आहे.
मासिक पाससाठी आता ओळखपत्र अनिवार्य
रेल्वेच्या नव्या नियमानुसार
मासिक पास (Season Ticket) घेण्याच्या वेळी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल.
ऑनलाइन सीझन तिकिट बुक करतानाही ID Proof अपलोड/सादर करणे आवश्यक.
ओळखपत्रावरील माहिती आणि सीझन तिकीटावरील माहिती अगदी जुळती असावी.
ओळखपत्र नसेल तर मासिक पास मिळणार नाही.
हा निर्णय विशेषतः फेक तिकिटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी घेण्यात आला आहे.
AC लोकलमध्येही मोठी तपासणी
फेक तिकिटधारकांवर लगाम घालण्यासाठी AC लोकलमध्येही
TC संपूर्ण डब्यात सखोल तपासणी करतील
विनातिकिट किंवा फेक तिकिटावर प्रवास करणाऱ्यांवर
त्वरित दंड
आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे
रेल्वेने GRP (Government Railway Police) ला देखील बनावटगिरीचे गुन्हे जलदगतीने दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेची संयुक्त कठोर मोहीम
12 डिसेंबरपासून मध्य व पश्चिम रेल्वेने संयुक्तरित्या मोठी कारवाई मोहीम सुरू केली आहे.
प्रत्येक स्टेशनवर आणि लोकलमध्ये विशेष तपासणी पथकं तैनात
विना तिकिट व बनावट तिकिटधारकांवर विशेष लक्ष
मोठ्या प्रमाणात दंड आणि कायदेशीर कारवाई होणार
रेल्वेचे आवाहन :
“योग्य तिकिट काढा आणि नियम पाळा अन्यथा कठोर दंड आणि शिक्षा टाळता येणार नाही.”
कायदेशीर शिक्षा : बनावट तिकिट = तुरुंगवास
बनावट किंवा फेक तिकीटावर प्रवास करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) मधील खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला जाईल
318(2), 336(3), 336(4), 340(1), 340(2), 3/5 हे कलम फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित गुन्ह्यांशी निगडित आहेत.
शिक्षा :
दंड
7 वर्षांपर्यंत तुरुंगवास
किंवा दोन्ही
मुंबई लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार
मुंबई लोकल प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमबद्ध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने योग्य तिकीट, वैध पास आणि ओळखपत्र सोबत ठेवणे अत्यावश्यक झाले आहे.

