- Home
- Utility News
- EPFOचे नवे नियम लागू! PF मधून आता किती पैसे काढता येतात? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
EPFOचे नवे नियम लागू! PF मधून आता किती पैसे काढता येतात? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स
EPFO New Withdrawal Rules : EPFO च्या नवीन नियमांनुसार घर खरेदी, शिक्षण, वैद्यकीय उपचार, बेरोजगारीच्या वेळी PF काढणे सोपे आणि जलद झाले आहे. काही परिस्थितीत ७५% तर काही परिस्थितीत १००% रक्कम काढता येते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळते.

EPFOचे नवे नियम लागू! PF मधून आता किती पैसे काढता येतात?
EPFOच्या नवीन गाईडलाइन्समुळे PF काढण्याची प्रक्रिया आता आधीपेक्षा अधिक सोपी आणि जलद झाली आहे. घर खरेदी, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा बेरोजगारी कोणत्याही गरजेच्या वेळी आता ठराविक मर्यादेत तात्काळ पैसे काढणे शक्य आहे. काही परिस्थितींमध्ये 75% तर काहींमध्ये थेट 100% PF काढण्याची परवानगी दिली आहे.
PF पूर्णपणे कधी काढता येतो?
गरज पडल्यावर अनेक वेळा लोक त्यांच्या PF मधील संपूर्ण रक्कम काढण्याचा विचार करतात, पण नियम स्पष्ट माहिती नसल्याने गोंधळ होतो. EPFOने स्पष्ट केल्याप्रमाणे, पीएफ हा निवृत्तीचा बचत निधी असल्याने पूर्ण रक्कम फक्त ठराविक परिस्थितींमध्येच काढता येते. नवीन नियमांनुसार पूर्वीचा 13 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आता फक्त 3 महिने केला आहे. 12 महिन्यांची नोकरी पूर्ण झाल्यानंतरही 100% PF काढणे शक्य झाले आहे.
घर, दुरुस्ती किंवा शिक्षणासाठी किती PF काढता येतो?
घर खरेदी किंवा दुरुस्ती
PF बॅलन्सच्या 90% पर्यंत रक्कम काढण्याची मुभा
उदाहरण : खात्यात 1 लाख असल्यास, 90,000 पर्यंत काढता येईल.
आरोग्य उपचार (Medical Emergency)
कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असल्यास 100% PF काढण्याची परवानगी.
शिक्षण / विवाह
मुलांच्या, भावंडांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी
75% PF (कॉन्ट्रिब्युशन + व्याज) काढता येते.
नोकरी सोडल्यास किंवा बेरोजगारीत किती PF मिळतो?
12 महिने नोकरी पूर्ण
PF मधून 75% रक्कम काढणे शक्य.
नोकरी गमावल्यास किंवा सोडल्यास
2 महिन्यांच्या बेरोजगारीनंतर 100% PF काढू शकता.
पूर्वी जिथे 5–7 वर्षे सेवा असणे गरजेचे होते, ते आता लक्षणीयरीत्या सुलभ केले आहे.
निवृत्ती नंतरचे नियम
सेवानिवृत्ती घेतल्यानंतर कर्मचारी संपूर्ण PF बॅलन्स सहजरीत्या काढू शकतात. EPFOने नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे
प्रक्रिया जलद
कागदपत्रे कमी
पैसे मिळण्यासाठी जास्त प्रतीक्षा नाही
आरोग्य, गृहनिर्माण आणि बेरोजगारीसारख्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी हेच EPFOचे उद्दिष्ट आहे.
PF काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा झाली खूप वेगवान
नवीन नियमांमुळे PF काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप वेगवान आणि सोयीस्कर झाली आहे. आता आपत्कालीन गरजांसाठी आर्थिक मदत कमी वेळात मिळू शकते.
