- Home
- Utility News
- Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता कधी येणार?, महिलांमध्ये वाढली उत्सुकता
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता कधी येणार?, महिलांमध्ये वाढली उत्सुकता
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना आहे. जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैमध्ये असेच होईल का अशी शंका आहे. योजनेला १ वर्ष पूर्ण झाले असून, लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील हजारो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. जून महिन्याचा हप्ता थोडा उशिरा मिळाल्याने, जुलै महिन्यातही असेच काही होणार का? असा प्रश्न अनेक महिलांना सतावत आहे.
1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार?
सध्या जुलै महिना संपायला केवळ 9 दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरच म्हणजेच 31 जुलैच्या आत 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, महिलांमध्ये अपेक्षा आहे की हा हप्ता वेळेत मिळेल.
एक वर्ष पूर्ण, योजनेचा ठरतोय मोठा आधार
‘लाडकी बहीण’ ही योजना सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या कालावधीत लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून, घरखर्च, शिक्षण व आरोग्यासाठी या रकमेचा मोठा उपयोग होत असल्याचं अनेक महिलांनी सांगितलं आहे.
कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ?
या योजनेचा लाभ सर्वांना मिळेल असं नाही. काही विशिष्ट अटी व निकष सरकारने ठरवले आहेत.
ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे,
ज्या महिला सरकारी सेवेत कार्यरत आहेत किंवा
इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत,
किंवा ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे,
त्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारी पडताळणी सुरुच
लाभार्थ्यांची निवड आणि पडताळणी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून, शासनाच्या निकषांनुसार पात्र महिलांनाच योजना लागू होईल. त्यामुळे काही महिलांना तात्पुरता लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

