- Home
- Maharashtra
- Kokan Railway Diwali Special Train: दिवाळीत कोकणात जाणार? कोकण रेल्वेची खास हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू; तारीख, मार्ग, वेळापत्रक येथे जाणून घ्या!
Kokan Railway Diwali Special Train: दिवाळीत कोकणात जाणार? कोकण रेल्वेची खास हॉलिडे स्पेशल ट्रेन सुरू; तारीख, मार्ग, वेळापत्रक येथे जाणून घ्या!
Kokan Railway Diwali Special Train: दिवाळीच्या सणासुदीच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष मेमू आणि एक्सप्रेस हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या मुंबई, कोकण आणि गोवा मार्गावर धावतील.

कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Kokan Railway Diwali Special Train: दिवाळीच्या सणासुदीच्या काळात कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष मेमू आणि एक्सप्रेस हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, कोकण आणि गोवा मार्गावरील गर्दीचा विचार करून या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे हॉलिडे स्पेशल ट्रेनची माहिती
गाडी क्र. 01004 – मडगाव जं. ते लोकमान्य टिळक टर्मिनस (अप)
चालणार: 5, 12 आणि 19 ऑक्टोबर
सुत्रस्तान: मडगाव जं. – सायंकाळी 04:30 वाजता
पोहोचणार: LTT – सकाळी 06:20 वाजता दुसऱ्या दिवशी
प्रमुख थांबे: करमळी, थिवीम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, ठाणे इ.
गाडी क्र. 01003 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जं. (डाऊन)
चालणार: 6, 13 आणि 20 ऑक्टोबर
सुत्रस्तान: LTT – सकाळी 08:20 वाजता
पोहोचणार: मडगाव जं. – रात्री 10:40 वाजता
डब्यांची रचना
2AC – 1, 3AC – 3, 3AC इकोनॉमी – 2, स्लीपर – 8, जनरल – 4, जनरेटर व SLR मिळून एकूण 20 डब्बे.
बुकिंग सुरू: 1 ऑक्टोबर 2025 पासून IRCTC वेबसाईट व PRS काउंटर्सवर
दुसरी हॉलिडे स्पेशल मेमू ट्रेन – चिपळूण - पनवेल
गाडी क्र. 01160 – चिपळूण ते पनवेल (अप)
चालणार: 3 ते 26 ऑक्टोबर दरम्यान, प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार
सुत्रस्तान: चिपळूण – सकाळी 11:05 वाजता
पोहोचणार: पनवेल – सायंकाळी 04:10 वाजता
गाडी क्र. 01159 – पनवेल ते चिपळूण (डाऊन)
चालणार: 3 ते 26 ऑक्टोबर दरम्यान, प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार
सुत्रस्तान: पनवेल – सायंकाळी 04:40 वाजता
पोहोचणार: चिपळूण – रात्री 09:55 वाजता
थांबे: अंजनी, खेड, माणगाव, रोहा, पेण, आपटा, सोमठाणे आदी
एकूण डब्बे: 8 मेमू कोचेस
प्रवाशांसाठी सूचना
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता, वेळेआधीच तिकीट आरक्षण करून ठेवा. ही गाड्या अनारक्षित असल्या तरीही काही ट्रेन्ससाठी आरक्षण आवश्यक आहे. प्रवासाची योजना आखताना वेळापत्रक आणि मार्ग तपासूनच निघा.