- Home
- Maharashtra
- Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी 'सुवर्णसंधी'!, 10वी उत्तीर्णांना 63,200 रु. पर्यंत पगार
Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमी अभिलेख विभागात 903 पदांसाठी 'सुवर्णसंधी'!, 10वी उत्तीर्णांना 63,200 रु. पर्यंत पगार
Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमी अभिलेख विभागात 'भूकरमापक' पदासाठी ९०३ जागांची भरती जाहीर झाली. या पदांसाठी १०वी उत्तीर्ण, संबंधित तांत्रिक पात्रता असलेले उमेदवार २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

भूमी अभिलेख विभागात भरतीची सुवर्णसंधी
Bhumi Abhilekh Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात (Bhumi Abhilekh Bharti) तब्बल 903 रिक्त पदांसाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 पर्यंत आकर्षक मासिक वेतन मिळणार आहे.
पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता
भूमी अभिलेख विभागात 'भूकरमापक' (Surveyor) या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
10वी (माध्यमिक शाळा परीक्षा) उत्तीर्ण.
मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा,
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
याशिवाय, उमेदवाराकडे मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM गतीचे प्रमाणपत्र (शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि वयोमर्यादा
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया: 01 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख: 24 ऑक्टोबर.
वयोमर्यादा: अर्जदारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
ही भरती प्रक्रिया पुणे, कोकण, मुंबई, नाशिक, छ. संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर या विभागांसाठी आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन परीक्षा पद्धतीने होणार आहे.
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासह इतर उमेदवारांसाठी: ₹1000/-
मागासवर्गातील उमेदवारांसाठी: ₹900/-
पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

