सार
वर्षाविहारासाठी निप्पाणी येथील युवक पोहता येत नसताना देखील दूधगंगा नदीपात्रात उतरले होते.
राधानगरी : पुणे जिल्ह्यातील लोणावळा तेथील भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निप्पाणी येथील १३ युवक काळम्मावाडी, राधानगरी येथे वर्षाविहारासाठी आले होते. त्यातील दोन युवक पाण्याच्या डोहात बुडाले. गणेश चंद्रकांत कदम (वय १८), प्रतीक पाटील (२२, दोघेही रा. आंदोलननगर निपाणी ) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सोमवार सकाळच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला गाडी चालक यांने डोहात उडी घेऊन गणेश पर्यंत पोहचला. पण गणेशने प्रतीक याला मिट्टी मारल्याने दोघेही बुडाले.
पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू
घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाणे बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. पाऊस जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघांने मृतदेह हाती लागले नाहीत.
आणखी वाचा :
Lonavala Bhusi Dam: भुशी डॅममागच्या डोंगरातील धबधब्यात 5 जण वाहून गेले, शोधकार्य सुरू