- Home
- Maharashtra
- International Yoga Day 2025 : रामदास आठवले ते नितीन गडकरी यांनी केला योगाभ्यास, पाहा PHOTOS
International Yoga Day 2025 : रामदास आठवले ते नितीन गडकरी यांनी केला योगाभ्यास, पाहा PHOTOS
International Yoga Day 2025 : आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील राजकीय नेते नितीन गडकरी ते रामदास आठवले यांनी योगाभ्यास केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नितीन गडकरी यांनी केला योगा
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूरच्या धंतोली येथील यशवंत स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावत नितीन गडकरी यांनी योगा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योगाभ्यास
पुण्यातील सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगा केला.
रामदास आठवले यांचा योगा
रामदास आठवले यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची योगा कार्यक्रमाला उपस्थिती
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणि #शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने 'योगा बाय द बे' या उपक्रमाचे आयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष असून यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.
खासदार श्रीकांत शिंदेंचा योगा
खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील जागतिक योग दिनानिमित्त योगा केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

